Lokmat Sakhi >Beauty > 'या' ३ कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात; बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे 

'या' ३ कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात; बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे 

How To Stop Premature Graying Of Hair: कमी वयात केस पांढरे होत असतील तर त्यासाठी या ३ गोष्टी जबाबदार आहेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात...(simple home remedies for white hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 05:06 PM2024-08-28T17:06:03+5:302024-08-28T17:08:00+5:30

How To Stop Premature Graying Of Hair: कमी वयात केस पांढरे होत असतील तर त्यासाठी या ३ गोष्टी जबाबदार आहेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात...(simple home remedies for white hair)

how to stop premature graying of hair, 3 main reasons for the premature gray hair, simple home remedies for white hair  | 'या' ३ कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात; बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे 

'या' ३ कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात; बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे 

Highlightsआवळा केसांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे दररोज सकाळी १५ मिली एवढा आवळ्याचा रस घ्यावा, असं त्यांनी सुचवलं. 

हल्ली कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. शाळकरी मुलांचेही केस सध्या पांढरे झालेले दिसत आहेत. कमी वयातच केस पांढरे झाले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे पांढऱ्या केसांचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतोच. कमी वयात पांढरे केस होत असतील तर त्यासाठी आहार, स्ट्रेस आणि तीव्र उन्हात नेहमीच खूप जास्त वेळ उभे राहणे, या ३ गोष्टी कारणीभूत ठरू शकतात (3 main reasons for the premature gray hair), असं आहारतज्ज्ञ सांगतात. बघा त्यासाठी नेमके काय उपाय करावे..(how to stop premature graying of hair)


कमी वयातच केस पांढरे होऊ लागले?

कमी वयातच केस पांढरे होत असतील तर त्यासाठी कोणत्याही लहानसहान गोष्टीचा जास्त ताण करून न घेणे हा एक उपाय आपण करू शकतो.

अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

शिवाय उन्हामध्ये जाताना सुती कपड्याने केस व्यवस्थित झाकून घेणे, हा नियमही पाळू शकतो. त्याशिवाय आहारात कोणते पदार्थ आवर्जून घेतले पाहिजेत याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रित कालरा यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे. त्यामध्ये त्यांनी पुढील काही उपाय सुचविले आहेत.

 

केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून उपाय

आवळा केसांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे दररोज सकाळी १५ मिली एवढा आवळ्याचा रस घ्यावा, असं त्यांनी सुचवलं. 

कलौंजी हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास त्वचेतले रक्ताभिसरण वाढते. केसांना चांगले पोषण मिळते आणि केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

केसांच्या वाढीसाठी कडिपत्ता अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे दररोज सकाळी कडिपत्त्याची ३ ते ४ पाने रिकाम्या पोटी खा असा सल्ला त्यांनी दिला.

काळे तीळ केसांसाठी सुपरफुड मानले जातात. त्यामुळे दिवसातून एकदा कधीही १ टीस्पून काळे तीळ खा, त्याचा केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं आहारतज्ज्ञ सांगतात.


 

Web Title: how to stop premature graying of hair, 3 main reasons for the premature gray hair, simple home remedies for white hair 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.