आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना प्रमाणापेक्षा जास्त ताण-तणावाचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ ताण-तणावात राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. देशात अजूनही मानसिक आरोग्याच्या त्रासांना गांभीर्यानं घेतलं जात नाही बरेच लोक मेंटल हेल्थशी निगडीत त्रासांकडे दुर्लक्ष करतात. ताण-तणाव कमी करून आपलं चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Stop Worring According To Asho Simple Tips To Be Happy)
ओशो सांगतात की, ताण नेहमी चुकीचा नसतो. ताणचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो. ताण नेहमीच निगेटिव्हच असेल तर असं नाही. जर आपण ताण येण्याच्या समस्येला निगेटिव्ह समजलं तर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच क्रिएटिव्ह एनर्जीच्या स्वरूपात वापरायला हवं. सगळ्यात आधी हे स्विकारायला हवं की भांडण्याची काही गरज नाही. फक्त एक संकेत आहे की शरीराला लढण्यासाठी तयार व्हायचं आहे.
निगेटिव्हीवर कंट्रोल कसं करायचं?
ओशो सांगतात की आपल्याला डिप्रेशन, वेदना किंवा कोणत्याही कठीण स्थितीचा पूर्णपणे अनुभव घ्यायला हवा. निगेटिव्हिटीवर मात करण्याचा दुसरा उपाय नाही. आपण या गोष्टींचा जितका अनुभव घ्याल तितकंच प्रकाश आणि सकारात्मकतेकडे जाल. आपल्यापैकी अनेकांमध्ये बऱ्याच भावना दडलेल्या असतात. ज्या बाहेर येण्याची गरज असते. वेगवेगळ्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी ताण-तणावातून बाहेर येणं फार महत्वाचे असते.
सक्रिय ध्यान करायला सुरूवात करा
ओशो यांच्यामते भूतकाळ आणि भविष्याबद्दल जास्त विचार करणं ताणतणाव आणि मानसिक समस्यांचे कारण ठरते. चुकीचा विचार करणं आपल्याला वास्तविकतेपासून दूर नेते म्हणूनच वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. वर्तमान स्थितीत अभ्यास करणं, नाचणं, फरशी पुसणं, जेवण बनवणं अशा कामांमध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त राहू शकता.
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओशो काय सांगतात
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओशो यांनी अनेक उपाय सांगितले आहे. ओशो सांगतात की मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, वेगानं चाला, मुलांशी बोला, चांगली पुस्तकं वाचा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालावा, ज्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल.