Lokmat Sakhi >Beauty > बाजारातून विकत आणलेली फुलं आठवडाभर राहतील फ्रेश- टवटवीत, २ खास टिप्स-फुलं कोमेजणार नाहीत..

बाजारातून विकत आणलेली फुलं आठवडाभर राहतील फ्रेश- टवटवीत, २ खास टिप्स-फुलं कोमेजणार नाहीत..

Home Hacks To Keep Flowers Fresh For Long: सणासुदीसाठी किंवा रोजच्या देवपुजेसाठी जर तुम्ही एकदम भरपूर प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती जास्त दिवस फ्रेश कशी ठेवायची, याबाबत काही खास टिप्स...(how to store flowers for long?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 05:28 PM2024-09-24T17:28:54+5:302024-09-24T18:53:52+5:30

Home Hacks To Keep Flowers Fresh For Long: सणासुदीसाठी किंवा रोजच्या देवपुजेसाठी जर तुम्ही एकदम भरपूर प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती जास्त दिवस फ्रेश कशी ठेवायची, याबाबत काही खास टिप्स...(how to store flowers for long?)

how to store flowers for long? simple tricks and tips to keep flowers fresh for long | बाजारातून विकत आणलेली फुलं आठवडाभर राहतील फ्रेश- टवटवीत, २ खास टिप्स-फुलं कोमेजणार नाहीत..

बाजारातून विकत आणलेली फुलं आठवडाभर राहतील फ्रेश- टवटवीत, २ खास टिप्स-फुलं कोमेजणार नाहीत..

Highlightsबाजारातून एकदम बऱ्याच प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती घरी कशी साठवून ठेवावी जेणेकरून ती आठवडाभर तरी खराब होणार नाहीत?

आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने घरी पुजेसाठी, सजावटीसाठी रोजच फुलं लागतात. आता दररोज बाजारात जाऊन फुलं आणणं तर काही शक्य नसतं. त्यामुळे बरेच जण एकदमच भरपूर फुलं आणून ठेवतात. पण नेमकं होतं असं की ती फुलं २- ३ दिवससुद्धा टिकत नाहीत. लगेच सडून जातात. खराब होतात. मग एवढे पैसे वाया गेले म्हणून वाईट तर वाटतेच शिवाय ऐनवेळी मग फुलांसाठी धावपळही करावी लागते (simple tricks and tips to keep flowers fresh for long). म्हणूनच बाजारातून एकदम बऱ्याच प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती घरी कशी साठवून ठेवावी जेणेकरून ती आठवडाभर तरी खराब होणार नाहीत, ते एकदा बघुया... (how to store flowers for long?)

 

फुलं आठवडाभर फ्रेश- टवटवीत ठेवण्यासाठी उपाय

१. जर तुम्ही जास्तीची फुलं घेणार असाल तर त्यांची निवड थोडी काळजीपुर्वक करा. शक्यतो झेंडू, ॲस्टर, शेवंती अशी फुलं घ्या. ती फुलं जास्त दिवस टिकतात. फुलं घेताना ती व्यवस्थित बघून घ्या. खूप जास्त उमललेली किंवा पाकळ्यांना थोडी खराब झालेली फुलं घेणं टाळा. 

दीपिका पादूकोण सांगते इवल्याशा बाळाला सांभाळताना नव्या आईची तारांबळ, सतत धाकधूक काही चुकलं तर..

२. फुलं जेव्हा घरी आणाल तेव्हा ती एखाद्या वर्तमान पत्रावर पसरवून टाका. त्यांच्यातला ओलसरपणा थोडा कमी होऊ द्या. कारण फुलांवर पाणी मारलेलं असतं. अशी ओली फुलं जेव्हा आपण डब्यात ठेवतो तेव्हा ती लवकर खराब होतात.

 

त्यामुळे त्यांचा ओलेपणा थोडा कमी झाला की प्रत्येक फुलं नीट तपासा आणि खराब फुलं, जास्त उमललेली फुलं, काळ्या पडलेल्या पाकळ्या असणारी फुलं लगेच वेगळी काढून ठेवा.

नवरात्री २०२४: रंगीलो म्हारो घागरो...!! गरबा- दांडिया स्पेशल सुंदर घागरा, बघा नजर खिळवणारे पॅटर्न्स...

३. त्यानंतर जी फुलं चांगली आहेत ती एखाद्या एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. किंवा तुमच्याकडे एअर टाईट डबा नसेल तर फुलं आधी कोरड्या असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि नंतर स्टीलच्या डब्यात ठेवून द्या. फुलं आठवडाभर छान टिकतील. 

 

Web Title: how to store flowers for long? simple tricks and tips to keep flowers fresh for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.