Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत बिना स्ट्रेटनरचे घरी केस स्ट्रेट करा; पाहा खास ट्रिक,१ रूपया खर्च न करता सुंदर दिसतील केस

दिवाळीत बिना स्ट्रेटनरचे घरी केस स्ट्रेट करा; पाहा खास ट्रिक,१ रूपया खर्च न करता सुंदर दिसतील केस

How To Straighten Hair Naturally : पार्लरमध्ये टेम्पररी  स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं तरी खूप पैसे लागतात आणि परमनेंट स्ट्रेटनिंगसाठी  ४ ते ५ हजार सहज जातात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:55 AM2024-10-30T11:55:19+5:302024-10-30T12:12:57+5:30

How To Straighten Hair Naturally : पार्लरमध्ये टेम्पररी  स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं तरी खूप पैसे लागतात आणि परमनेंट स्ट्रेटनिंगसाठी  ४ ते ५ हजार सहज जातात

How To Straighten Hair Naturally Without Straightner At Home | दिवाळीत बिना स्ट्रेटनरचे घरी केस स्ट्रेट करा; पाहा खास ट्रिक,१ रूपया खर्च न करता सुंदर दिसतील केस

दिवाळीत बिना स्ट्रेटनरचे घरी केस स्ट्रेट करा; पाहा खास ट्रिक,१ रूपया खर्च न करता सुंदर दिसतील केस

दिवाळी (Diwali) म्हणलं की नटणं आलंच. महिलांना खास सणांच्या दिवशी मस्त  नवीन कपडे घालायला फार आवडते. पण  कपड्यांसोबतच आपले केस  हवे तसे सेट केलेले असणंही फार महत्वाचं असतं. कारण तुमचे केस कसे आहेत, कसे दिसतात यावर अनेक गोष्टी  अवलंबून असतात. बऱ्याच लोकांना सणासुधीला केस स्ट्रेट करायचे असतात पण स्ट्रेटनर नसल्यामुळे केस  स्ट्रेट करता येत नाहीत. (How To Straighten Hair Naturally Without Straightener At Home) पार्लरमध्ये टेम्पररी  स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं तरी खूप पैसे लागतात आणि परमनेंट स्ट्रेटनिंगसाठी  ४ ते ५ हजार सहज जातात.केस स्ट्रेट करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय  करू शकता. या उपायांनी केस  सिल्की आणि शायनी दिसतील. (How To Straight Your Hairs At Home) 

ओले केस असे बांधा

जेव्हा तुमचे केस ओले असतील तर तेव्हा डोक्याच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घेऊन जा आणि हेअर क्लिप लावा. केस सुकल्यानंतर हेअर क्लिप काढून टाका  ज्यामुळे केस सरळ दिसून येतील. तुम्ही रात्रीच्या वेळेस केसांना क्लिप लावू शकता किंवा सिल्कचा स्कार्फ बांधा यामुळे केसांचा फ्रिजीनेस निघेल आणि केस स्ट्रेट होतील.

केसांचा आंबाडा बांधा

जर  तुमचे केस लांब असतील तर स्ट्रेट करण्यासाठी हा नॅच्युरल उपाय आहे. यासाठी केस आंबाड्यामध्ये बांधून ठेवा. केसांचा आंबाडा बाधून फिरवा. ओल्या केसांचा आंबाडा बांधला आणि  नंतर केस सोडले तर केस स्ट्रेट दिसून येतात.

कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणतं मंगळसुत्र सुट होतं? पाहा-साडीत एकदम परफेक्ट, सुंदर दिसाल

केळी आणि दही

केळी, दही, मध आणि ऑलिव्ह ऑईल  एकत्र मिसळून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. ज्यामुळे केस स्ट्रेट राहतील. २ पिकलेली केळी घेऊन  व्यवस्थित एकत्र करा.  त्यात २ चमचे मध घाला आणि ऑलिव्ह ऑईल घाला त्यात १ चमचा दही मिसळा. हा हेअर मास्क केसांना अर्धा तास लावून ठेवा. धुतल्यानंतर केस  स्ट्रेट झालेले दिसून येतील

Web Title: How To Straighten Hair Naturally Without Straightner At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.