नखं आपल्या आरोग्याची लक्षणे दाखवतात. बऱ्याच जणांना नखं वाढवण्याची हौस असते. पण जर आहार संतुलित नसेल तर, नखांची वाढ खुंटते. नखं लांब व मजबूत असावी असं कोणाला वाटत नाही. महिलांच्या बोटांवर लांब नखं शोभून दिसतात.
परंतु, इतर कामं किंवा नखांची योग्य काळजी न घेणे, आरोग्याच्या निगडीत समस्या या कारणांमुळे नखं खराब होतात, किंवा तुटतात. नखं मजबुत, व सुंदर दिसावे असे आपल्याला वाटत असेल तर, आहारात या ५ गोष्टींचा समावेश करा. यामुळे नखांची वाढ होईल, व मजबूतही होतील(How to Strengthen Nails: Eat 5 Foods).
नखं मजबूत करणारे पदार्थ
बायोटिनयुक्त पदार्थ
हेल्थलाइन या वेबसाईटच्या मते, ''बायोटिन म्हणजेच बीकॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, ज्याच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होतात. हे नवीन पेशी आणि प्रथिने तयार करण्यास मदत करतात. यासाठी आहारात दूध, रताळे इत्यादींचा आहारात समावेश करा''.
कानाचे छिद्र मोठे झाले, कान ओघळलेत? १ उपाय - कानातले लोंबणार नाहीत..
व्हिटॅमिन बी 12
नखांच्या मजबुतीसाठी, शरीरात लोह अधिक चांगले शोषले जाणे, व रेड ब्लड सेल्स जलद गतीने बनणे गरजेचं आहे. ज्यामुळे नखं मजबूत आणि लांबही होतात. यासाठी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थाचे सेवन करा.
आयर्न
नखांच्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम लोह करते. निरोगी नखांसाठी, त्यांना उत्तम ऑक्सिजन पुरवठा मिळणे आवश्यक आहे. यासाठी आहारात लोहयुक्त अन्न म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, काजू इत्यादी पदार्थांचे सेवन करा.
आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत
प्रथिने
शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होतात. ज्यामुळे ते सहज तुटतात. अशा परिस्थितीत नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रोटीनचे आहारात समावेश करा. उदाहरणार्थ, डाळी, बीन्स इत्यादी पदार्थांचे सेवन करा.
मॅग्नेशियम
निरोगी नखांसाठी, शरीरात मॅग्नेशियमची गरज भासते. नखांची योग्य वाढ होण्यासाठी आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थ असणे गरजेचं आहे. यासाठी आहारात पालेभाज्या, बदाम, काजू, शेंगदाणे इत्यादींचे सेवन करा.