अनेक जणींना नाक टोचण्याची खूप आवड असते.. लहानपणी काही कारणाने टोचायचं राहून जातं.. किंवा टोचलेलं नाक पुन्हा बुजून जातं.. लहानपणाचा तो सगळा त्रास (how to reduce pain of nose piercing?) माहिती असतो किंवा मग मैत्रिणींचा, बहिणींचा पाहिलेला असतो.. पण नाक टोचण्याची इच्छाच एवढी दांडगी असते की हा सगळा त्रास सहन करण्याची तयारी असते.. पण तरी तरुणवयात नाक टोचणं ही खरोखरंच सहज घेण्यासारखी गोष्ट नाही... कारण वाढत्या वयासोबत त्वचाही जाड आणि राठ होते आणि मग नाक टोचण्याचा जास्त त्रास होतो... (nose piercing in adult age)
असंच काहीसं अभिनेत्री अमृता खानविलकरचंही (nose piercing by Amruta Khanvilkar) झालं. तिने तिच्या एका आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेची गरज म्हणून नाक टोचलं.. नाक टोचल्यानंतर तिला कशा वेदना झाल्या, जाडजूड नथ नाकात घातल्यानंतर त्याचा कसा त्रास व्हायचा, याचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामला पोस्ट केला आहे.. नाक टोचण्याचा अनुभव घेणारी प्रत्येक जण अमृताचा त्रास समजू शकते.. नाक टोचल्यावर त्रास तर होणारच पण काही आजीबाईंचे जुने नुस्के वापरले तर हा त्रास नक्कीच कमी करता येऊ शकतो..
तरुणवयात नाक टोचायचं असेल तर अशी काळजी घ्या..१. तरुणवयात किंवा लहानपणी नाक टोचताना ते शक्यतो सोन्याने किंवा तांब्याच्या तारेने टोचा.. काहीजणी नाकात थेट मोरणी घालूनच नाक टोचतात. पण तसं करू नका. सुरुवातीला काही काळ नाकात केवळ तार घाला.२. नाकात तार घातल्यानंतर कोणतंही क्रिम लावू नका. कारण क्रिममध्ये असणारे केमिकल्स तुमचं दुखणं वाढवू शकतात. त्यामुळे शक्यतो काेमट खोबरेल तेल दिवसातून तीन ते चार वेळा नाकावर लावा. करण नाक टोचलंय ती जागा कोरडी पडू देऊ नये, कारण त्यामुळे खाज येऊ शकते. तेल लावताना स्वच्छ कपडा किंवा कापूस वापरा. कोमट तेल लावल्याने नाकाला चांगला शेक बसेल.
३. नाक टोचल्यानंतर साधारण २०- २२ तास झाल्यानंतर नाकातली तार हळूहळू पुढे आणि मागे सरकविण्याचा प्रयत्न करा.. ही क्रिया खूप अलगद आणि हळूवार करा.. नाकातली तार जेवढ्या लवकर फिरवली जाईल तेवढं तुमचं दुखणं कमी होत जाईल. पण नाकाला हात लावताना प्रत्येकवेळी हात स्वच्छ धुवून घ्या.. नाहीतर इन्फेक्शन होण्याचा धाेका असतो. ४. नाक खूपच ठणकत असेल तर बर्फाचा शेक द्या. असं करताना नाक जिथे टोचलंय, त्याच्या खालच्या भागावर अलगद बर्फ फिरवा.. यामुळे नाकाच्या आखडून गेलेल्या नस मोकळ्या होतील आणि थोडा आराम पडेल. ५. नाक टोचायचंच असेल तर थंडीच्या दिवसांत टोचणं टाळावं.. कारण थंडीत कोणतीही जखम जरा जास्तच ठसठसते.