Join us  

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 10 सोपे उपाय, पावसात मस्त भिजा- केसांची चिंता सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 1:58 PM

पावसाळ्यात केसांची (hair care in monsoon) नीट काळजी घेतली नाही (hair problems in rainy season) तर केसांवर महागड्या ट्रीटमेण्ट घेण्याची गरज पडते. त्यामुळे केसांचं आणखीनच नुकसान होतं. हे होवू नये यासाठी पावसाळ्यात केसांची काळजी घेणं हाच योग्य उपाय आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात केसांना पोषण कमी मिळतं. केसांचं पोषण व्हावं यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे.  पावसाळ्यात केस गळू नये म्हणून तेलकट पदार्थ खाणे टाळावेत.हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर टाळावा. 

 पाऊस सगळ्यांनाच  आवडतो. पावसात भिजायला, फिरायला मजा येते. पावसाळ्यात आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचा जसा धोका असतो तसाच धोका केसांनाही असतो. पावसाळ्यात केसांच्या विविध समस्या (hair problems in monsoon)  डोकं वर काढतात. केस गळतात, रुक्ष होताता, केसात कोंडा वाढतो. पावसाळ्यात केसांची नीट काळजी घेतली नाही तर  (hair care in monsoon) केसांवर महागड्या ट्रीटमेण्ट घेण्याची गरज पडते. त्यामुळे केसांचं आणखीनच नुकसान होतं. हे होवू नये यासाठी पावसाळ्यात केसांची काळजी घेणं  (hair care tips in rainy season) हाच योग्य उपाय आहे. केस जपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी पावसाळ्यात केस चांगले (healthy and shiny hair in monsoon)  राहातात.

Image: Google

1. पावसाळ्यात केसांना नीट पोषण मिळालं नाही तर केस तुटतात, गळतात. केसांना पोषण मिळण्यासाठी आठवड्यातून 2 /3 वेळा तेलानं केसांच्या मुळांशी मसाज करत तेल लावावं. केसांना तेल लावल्यानंतर काही तासांनी केस धुवावेत.  या उपायानं केस तुटत गळत नाहीत आणि केसात कोंडा होणं, खाज येणं या समस्याही निर्माण होत नाही. 

2. पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे केसातील माॅइश्चर कमी होतं. पावसाळ्यातील आर्द्र वातावरणात केसातील माॅइश्चर जपण्यासाठी केस बांधून ठेवावेत.  केस पावसाच्या पाण्यानं बराच  काळ ओले राहिले तर केसांच्या मुळाशी असलेलं माॅइश्चर उडून जातं. अशा परिस्थितीत केस बांधून ठेवणे हाच योग्य उपाय.

Image: Google

3. पावसात भिजल्यानंतर नुसते केस कोरडे करुन उपयोगाचं नाही.  पावसाच्या पाण्यात केसांना हानिकारक घटक असतात. ते जर केसातून गेले नाही तर केस गळतात. हे असं होवू नये म्हणून पावसात केस ओले झाल्यास घरी आल्यावर शाम्पूनं धुणं, केसांना कंडिशनर लावणं आवश्यक आहे. पावसाळ्यात केस धुण्यासाठी शाम्पूची योग्य निवड करणं महत्वाचं असतं. केसांना स्ट्राॅंग शाम्पू न लावता सौम्य शाम्पूचा वापर करावा. शाम्पू केल्यानंतर कंडीशनर अवश्य लावावं. यामुळे केस मऊ राहातात. केसात गुंता होत नाही. केसांना कंडीशनर लावताना ते केसांच्या मुळाशी नाही तर केसांना लावणं आवश्यक असतं.  केस कोरडे झाल्यानंतर मग बांधावेत. ओले किंवा भिजलेले केस बांधल्यास केस तुटतात. केस विंचरताना मोठ्या दातांचा कंगवा वापरावा यामुळे केस तुटत नाही. 

4. पावसाळ्यात केसांचं सौंदर्य हरवतं. म्हणूनच केस धुतल्यानंतर केसांना सीरमही लावावं. सीरमचे काही थेंब घेऊन ते केसांना लावल्यास केस सुंदर दिसतात. मऊ मुलायम होतात. केसांना चमक येते आणि केसात गुंताही होत नाही. सीरम लावतानाही ते केसांना लावावं केसांच्या मुळांना लावू नये. 

5.पावसाळ्यात पार्लरमध्ये जावून हेअर स्पा घेण्यापेक्षा घरच्या घरी हेअर स्पा घेणं फायदेशीर ठरतं. घरच्याघरी हेअर स्पा करण्यासाठी केसांना कोमट तेलानं मालिश करावी. केसांवर तेल रात्रभर राहू द्यावं. सकाळी उठल्यानंतर केस 40 मिनिटं रुमाल गरम पाण्यात पिळून तो केसांवर गुंडाळावा. नंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. घरच्याघरी अशा पध्दतीनं हेअर स्पा केल्यास केसांना पोषणही मिळतं. 

Image: Google

6. पावसाळ्यात केस गळू नये यासाठी  बाहेर किंवा घरी तळलेले पदार्थ खाऊ नये. तेलकट पदार्थांमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. रक्तप्रवाह संथ होतो.  प्रथिनं, जीवनत्वं आणि खनिजं या घटकांचा समावेश असलेला आहार घ्यावा. 

7. पावसाळ्यात केस ओलसर राहिले तर केसात ऊवा होण्याचा धोका असतो.  हा धोका टाळण्यासाठी तेल लावताना त्यात थोडा कापूर चुरुन घालावा. तो तेलात मिसळून त्या तेलानं केसांना मालिश करावी.  यामुळे केसात ऊवा होण्याचा धोका टळतो आणि केसही मजबूत होतात. 

8. पावसाळ्यात केसांना घरगुती हेअर मास्क अवश्य लावावेत. दही आणि लिंबाचा हेअर मास्क लावल्यास केसातील कोंडा निघून जातो. दह्यामुळे केस मुलायम होतात. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी, केसांना पोषण मिळण्यासाठी कडुनिंबाची पानं वाटून त्याचा लेप करुन तो केसांना लावल्यास पावसाळ्यात उद्भवणाऱ्या केसांच्या समस्या दूर होतात. 

Image: Google

9. पावसाळ्यात केसांना पोषण कमी मिळतं त्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. त्यात जर हेअर स्टायलिंग टूलचा जास्त वापर केल्यास केस आणखी कमजोर होवून तुटतात. हेअर स्टायलिंग टूलचा वापर करुन केस मोकळे ठेवण्यापेक्षा हेअर स्टायलिंग टूलचा वापर टाळून केस बांधून ठेवावेत. 

10. पावसाळ्यात बाहेर जाताना केस झाकलेले असावेत. केसांना स्कार्फ गुंडाळलेला असावा किंवा डोक्यावर छत्री धरुन केस पावसात ओले होण्यापासून वाचवावेत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमानसून स्पेशलपाऊस