Join us  

केस रंगवताना काळजी वाटते का?; आता बिनधास्त हेअर कलर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:21 PM

कलर केलेल्या केसांची काळजी घेतली नाही तर मग केसांचं नुकसान अटळ असतं. हे टाळण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणं आवश्यक आहे.

स्टायलिश, फॅशनेबल आणि मोहक दिसायचं असेल तर केस कलर करायलाच हवेत असं मानण्याचा हा काळ आहे. पूर्वी केस पांढरे झाले तरच मेहंदी लावली जायची किंवा डाय वापरलं जायचं. पण केस कलर करण्याचा ट्रेण्ड जसा रुळला तसा केस पांढरे असले तरच कलर करायचे ही पद्धत मागे पडून आवड म्हणून, आकर्षक आणि मोहक दिसण्यासाठी, स्टायलिश लूकसाठी केस कलर करण्याचं प्रमाण आता वाढलं आहे.

केस कलर करणं म्हणजे केसांवर एक प्रकारची रासायनिक उपचार करणंच असतं. म्हणूनच केस कलर केल्यानंतर केसांची विशेष काळजी घेणं, खास कलर केसांसाठी म्हणून असलेले शाम्पू, कंडिशनर आणि सीरम वापरणं गरजेचं असतं. कलर केलेल्या केसांची काळजी घेतली नाही तर मग केसांचं नुकसान अटळ असतं. हे टाळण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणं आवश्यक आहे.

कलर केलेल्या केसांची काळजी कशी घ्याल?

1. कलरमधे रासायनिक घटक असतात. त्यामुळे कलर केलेल्या केसांची नीट काळजी घेतली नाही तर केस पांढरे होतात, केस कमजोर होवून तुटतात आणि रुक्ष होतात. त्यामुळेच कलर केलेल्या केसांसाठी कोणता शाम्पू कंडिशनर वापरता हे खूप महत्त्वाचं ठरतं. जर केस धुण्यासाठी सल्फेटयुक्त शाम्पू-कंडिशनर वापरलं तर केसांमधे असलेली आर्द्रता ( मॉइश्चर ) निघून जातं. केस कोरडे होतात आणि जास्त गळतात. तसेच केसांचा रंगही निघायला लगतो. म्हणून कलर केसांसाठी सल्फेट फ्री शाम्पू - कंडिशनर महत्त्वाचं आहे.

2. गरम कडकडीत पाण्यानं आंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. अशाच गरम पाण्यानं केस धुतले तर केसांचं नुकसान होतंच. पण कलर केलेल्या केसांचं जास्त नुकसान होतं. म्हणूनच कलर केलेल्या केसांची काळजी घेताना गरम पाण्यानं केस धुणे टाळायला हवं. कारण कलरमधील रासायनिक घटकांचा आधीच केसांवर परिणाम झालेला असतो. त्यात जर केस धुण्यासाठी गरम पाणी वापरलं तर केस आणखीनच खराब होतात. कलर केलेले केस धुताना पाण्याचं तापमान सामान्य हवं. कोमट पाण्यानं केस धुवायला हवेत.

3. कलर केलेल्या केसांची काळजी घेताना केस किती वेळा धुवायचे याचेही नियम पाळायला हवेत. केस जर सारखे धुतले तर केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं आणि केसांमधे कोरडेपणा वाढतो. म्हणूनच आठवड्यातून दोन वेळा केस धुणं योग्य मानलं जातं. केस धुण्याआधी केसांना तेल लावणं आवश्यक आहे.

4. केस कलर करणं जितकं गरजेचं वाटतं तितकीच केसांची स्टाइल करणंही गरजेचं वाटतं. पण केसांची स्टायलिंग करताना हिंटींग टूल्स वापरले जातात. या हिंटीग टूल्सच्या वापरानं मात्र कलर केलेले केस खराब होतात. हिटींग टूल्सच्या उष्णतेने केसांमधील आद्र्रता निघून जाते. केसांना केलेल्या कलरवरही त्याचा परिणाम होवून केसांचा रंग फिका होवू लागतो. म्हणूनच कलर केलेल्या केसांसाठी हिंटींग टूल्स न वापरणं योग्य ठरतं.

कलर केलेल्या केसांसाठी मोह सल्फेट फ्री हर्बल शाम्पू

1. कलर केलेल्या केसांची योग्य काळजी घ्यायची असेल तर ‘मोह सल्फेट फ्री हर्बल शाम्पू’ वापरावा. चरक फार्माचा ‘मोह’ हा ब्रॅण्ड गेली ७४ वर्ष आयुर्वेद उत्पादनात आपली गुणवत्ता राखून अग्रस्थानी आहे.

2.  सल्फेट फ्री हर्बल शाम्पू, त्यात असलेले केरॅटिन, यामुळे केसांचे गळणे थांबून, केसांचा पोत सुधारतो.

3 . कोरड्या, रुक्ष, खराब केसांसाठी मोह सल्फेट फ्री हर्बल शाम्पू प्रभावी काम करतो. हा सल्फेट फ्री केरॅटिन शाम्पूत ग्रीन टी, अर्गन वनस्पती सूर्यफूल यांच्यातील उत्तम घटकांचा समावेश आहे. हे घटक केस सौम्य रीतीने स्वच्छ करतात आणि केस गळती रोखतात. या शाम्पूमुळे टाळुची स्वच्छताही ( स्काल्प) सौम्यपणे होते.

4 मोह हर्बल शाम्पूमुळे केस वाढण्यास मदत होते.

5. केरॅटिन ट्रीटेड केसांची काळजी घेण्यासाठी मोह हा उत्तम सल्फेट फ्री शाम्पू आहे. या शाम्पुच्या उपयोगानं केश तंतू मऊ होतात आणि केस सहज विंचरले जातात.

6. या शाम्पूतील ॲण्टिऑक्सिडण्टसयुक्त फॉम्यरुलानं केस गळती नियंत्रित होवून केस वाढण्यास मदत होते.

7. मोह सल्फेट फ्री हर्बल शाम्पू हा कलर आणि ट्रीट्रेड केसांसाठी योग्य असून 50 वेळा केस धुतल्यानंतरही केसांचा रंग टिकून राहातो हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे.

8. मोह सल्फेट फ्री हर्बल शाम्पू हा 200 मिली सल्फेट फ्री शाम्पू सोबत 100 मिली हेअर सीरम या फॅमिली पॅकमधे 644 रुपयांमधे उपलब्ध आहे. तर 100 मिली सल्फेट फ्री शाम्पू सोबत 30 मिली हेअर सीरम या इंडिव्हिज्युअल पॅकमधे 380 रुपयांमधे उपलब्ध आहे.

मोह हर्बल हेअर सीरम

1. मोह हर्बल हेअर सीरम हे जवस आणि जास्वंदीच्या तेलानं आणि वॉटर लिलीच्या पोषक गुणांनी समृध्द आहे. मोह सीरम वापरुन तुम्ही केसांच्या अत्यंत सुंदर रचना करु शकता. स्टाइल युअर हेअर, जसं तुम्हाला हवे तसे. रुक्ष आणि कुरळ्या केसांसाठीही हे सीरम ‘बेस्ट रेटेड’ सीरम ठरले आहे. सर्व प्रकारच्या केंसांसाठी हे सीरम उत्कृष्ट मानले जाते, आणि वापरण्यास सुयोग्य आहे.

2. मोह हेअर सीरम वापरल्यानं केसांना दैनंदिन प्रदुषण, धुळ यांचा जो त्रास होता त्यापासूनही संरक्षण देते. स्टायलिंगने केसांना होणारे नुकसानही टाळते.

३. हे सीरम सल्फेट आणि पॅरॅबेन मुक्त असून भारतातील उत्तम हर्बल आणि नैसर्गिक हेअर सीरम आहे.

४. केसांची स्टायलिंग करताना गरम स्टायलिंग टूलच्या उपयोगानं होणारं केसांचं नुकसान या सीरमच्या उपयोगानं टळतं.

५. मोह हर्बल हेअर सीरम हे 200 मिली सल्फेट फ्री शाम्पू सोबत 100 मिली हर्बल हेअर सीरम या फॅमिली पॅकमधे 644 रुपयांना उपलब्ध आहे. तर 100 मिली सल्फेट फ्री शाम्पू सोबत 30 मिली हेअर सीरम या इंडिव्हिज्युअल पॅकमधे 380 रुपयांना उपलब्ध आहे. www.moha.co.inया वेबसाईटवरही ही उत्पादनं उपलब्ध आहेत याशिवाय अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, स्मिटन, फार्मसी आणि फस्टक्राय या नावाजलेल्या इ- कॉर्मर्स साइट्सवरही मोहाची उत्पादनं मिळू शकतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी