Join us

कुरळे केस सतत ड्राय होतात? ४ सोपे उपाय, केस होतील सिल्की आणि शायनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2025 12:30 IST

How to get silky and shiny hair: curly hair: curly silky hair: curly hair to silky hair naturally: what not to use on curly hair: hair care tips: curly hair care: तुमचे देखील केस कुरळे आणि सतत कोरडे होत असतील तर हे ४ सोपे उपाय नेहमी लक्षात ठेवा...

प्रत्येक व्यक्तीच्या रुपानुसार त्याच्या केसांची संरचना असते. कुणाचे लांबसडक तर कुणाचे लहान, कुणाचे कुरळे तर कुणाचे सॉफ्ट. (curly hair to silky hair naturally) केस निरोगी आणि मऊ दिसण्यासाठी आपण केसांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. वाढते प्रदूषण, खराब जीवनशैली आणि केसांना पुरेशा प्रमाणात पोषक तत्व न मिळाल्याने केसगळती सुरु होते. सरळ आणि चमकदार कोणाला आवडत नाही. ( hair care tips) पण कुरळे केस खूप कमी महिलांना सूट करतात. खरेतर केस कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं गरजेच आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारचे हेअर प्रॉडक्ट्स निवडायचे हे देखील समजायला हवे.(curly silky hair) अनेक जण आपल्या कुरळ्या केसांची योग्य ती निगा राखत नाही. त्यामुळे केसगळती तर वाढते पण विंचरताना देखील त्यांना त्रास होतो. केस खूप कुरळे आणि कोरडे असतील तर किती वेळा ही विंचरले तरी न विंचरल्यासारखे वाटतात. जर तुमचे देखील केस कुरळे आणि सतत कोरडे होत असतील तर हे ४ सोपे उपाय नेहमी लक्षात ठेवा. 

1. कंगव्याचा वापर टाळा

तुमचे केस चमकदार आणि मऊसुत करण्यासाठी केसांसाठी सारखा कंगव्याचा वापर करु नका. कुरळे केस कंगव्याने सारखे विंचरल्याने ते अधिक तुटतात. त्यामुळे त्यांची चमकही कमी होते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही मोठ्या दाताचा कंगवा वापरा. 

2. कंडिशनर वापरा 

जर तुम्हाला तुमचे केस सॉफ्ट आणि शायनी हवे असतील तर केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. कंडिशनर वापरल्याने केस रेशमी होतील. तसेच त्यांची चमकही वाढेल. कंडिशनर हे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे प्रदूषण आणि इतर गोष्टींपासून त्यांचे संरक्षण होते. 

3. स्ट्रेटनिंग मशीन 

केस सरळ करण्यासाठी अनेक हेअर स्ट्रेटनिंगचा वापर करतात. कुरळे केस हे मऊ असल्यामुळे स्ट्रेटनिंग वापरल्यास ते खराब होतात. तसेच हेअर ड्रायरने केस सुकवल्यासही तुमचे केस लवकर तुटतात. ज्यामुळे केसगळती देखील वाढते. 

4. टॉवेलने केस घासू नका 

केस धुतल्यानंतर निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी केसांना व्यवस्थित पुसा आणि नैसर्गिक सुकू द्या. केस वाळवताना टॉवलने वारंवार घासू नका. यामुळे केसगळती होते आणि केस अधिक कोरडे होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी