Join us  

पावसांत भिजल्यावर केस खूप ड्राय - रखरखीत होतात ? पावसाळ्यात केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 6:05 PM

5 Essential Monsoon Hair Care Tips For You : पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी टिप्स,जपा केसांचे सौंदर्य..

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूंमध्ये केसांची काळजी घ्यावीच लागते. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी, त्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. सध्या सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या पावसाळ्यात अनेकजणींना केसांच्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटण्याची समस्या अधिक वाढते. केस ड्राय, रखरखीत होण्याच्या समस्याही वाढू लागतात. कोंडा ही देखील या ऋतूतील सामान्य समस्या आहे(Monsoon Hair Care Tips).

पावसात भिजल्यास स्कॅल्पमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. केसांच्या या अनेक (Hair Care Tips You Need To Follow During The Monsoon Season) समस्यांमुळे विशेषत: मुलींना या ऋतूचा मनमोकळा आनंद घेता येत नाही. पण यासोबतच त्यांना त्यांच्या केसांची चिंता देखील असते. कारण पावसात केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते(How To Take Care Of Your Hair During The Rainy Season).

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ? 

१. पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा :- पावसाळ्यात बाहेर येता - जाता आपले केस भिजतात, केस भिजल्यामुळे अधिक तुटतात. हे टाळायचे असल्यास केस पावसात भिजल्यावर घरी आल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. केसांना शाम्पू लावून २ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने केस  पाण्याने स्वच्छ धुवा, असे केल्याने केसांमधील घाण पूर्णपणे साफ होईल.

२. तेलाने मसाज करा :- शाम्पूच्या १५ मिनिटे आधी खोबरेल तेल लावल्याने केस प्री - कंडिशनिंग होण्यास मदत होते. त्यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणाही कमी होतो.

हेअर स्पा करण्याचे १० फायदे, केस तर सुंदर दिसतीलच पण केसांसाठी ‘महत्वाचे’ लाभ खरे वेगळे..

३. संसर्ग टाळा :- पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी केस आणि स्कॅल्पसाठी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करावा जे संक्रमणापासून केसांचे संरक्षण करु शकतील. कोरफड, मेथी आणि आवळा यांसारख्या गोष्टी पावसाळ्यात अशा प्रकारच्या संसर्गापासून केसांचे संरक्षण करतात. आपला कंगवा कोणाशीही शेअर करू नका, यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.

४. हेअरस्टाईल काळजीपूर्वक करा :- पावसाच्या पाण्यांत भिजून केस ओले होऊ नये म्हणून हाय पोनीटेल किंवा बन अशा हेअर स्टाईल करा. यामुळे तुमचे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर स्कॅल्पला खाज येणे आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होईल.

केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स-रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...

५. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा :- पावसाळ्यात आपले केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. वातावरणातील अधिक आर्द्रतेमुळे केसांची चमक आणि व्हॉल्युम कमी होते. अशावेळी केसांना सूट होईल असा शाम्पू आणि कंडिशनर निवडा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा आणि ओल्या केसांवर चांगले हेअर सीरम वापरा यामुळे तुमचे कसे फ्रिजी होणार नाहीत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी