Join us  

पावसाळ्यात केस भिजले तर अजिबात करु नका ३ गोष्टी, केस गळणं वाढेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 5:17 PM

How To Take Care of Your Hair In Monsoon : ओल्या केसांवर काही प्रयोग केल्यास ते जास्त गळण्याची शक्यता असते.

पावसाळा म्हटला की चिकचिक आणि सतत पडणारी संततधार यामुळे काही वेळा नको नको होऊन जाते. या काळात आजारपणंही अचानक वाढतात. त्यामुळे पावसाळा एन्जॉय करत असताना योग्य ती काळजी घ्यायला हवी असे वारंवार सांगितले जाते. पावसाळ्यात त्वचेचा, केसांचा पोतही खराब होण्याची शक्यता असते. आपले केस छान असावेत आणि कायम छान राहावेत यासाठी आपण त्यांच्यावर वेगवेगळ्या ट्रिटमेंटस घेतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. सिझन बदलला की केस गळतीची समस्या सुरू होते (How To Take Care of Your Hair In Monsoon).

अशावेळी बाजारात विविध उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. पण ही उत्पादने आपल्या केसांसाठी अजिबात चांगली नसतात कारण त्याचे केसांवर विपरीत परीणाम होतात. तसेच ओल्या केसांवर काही प्रयोग केल्यास ते जास्त गळण्याची शक्यता असते. गळून गळून केस पातळ झाले की काय करायचे असा यक्षप्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. मात्र ओल्या केसांवर काही गोष्टी वापरणे आवर्जून टाळायला हवे. जेणेकरुन केसगळती कमी होईल आणि केस लांब आणि जाड होतील. 

१. पावसाच्या पाण्यापासून वाचवा

कधी आपण मुद्दामहून तर कधी अचानकपणे पावसाच्या पाण्यात भिजतो. पण अशाप्रकारे पावसात भिजणे केसांसाठी अजिबात चांगले नसते.     काही कारणाने केस पाण्यात भिजलेच तर ते कोरडे करुन त्याला खोबरेल तेलाने मसाज करावा. बोटाने केसांना आणि मूळांना हळूवार मसाज केल्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते. २ ते ३ तासांनी केस शाम्पू आणि कंडीशनरने स्वच्छ धुवावेत. असे केल्याने केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. 

२. ब्लो ड्रायर

घाईघाईत तयार होताना अनेकदा आपण ब्लो ड्रायरचा वापर करतो. केस पटकन वाळावेत यासाठी हा सोपा आणि झटपट उपाय असतो. मात्र या ब्लो ड्रायरमुळे केसांचा पोत तर खराब होतोच आणि केस एकाएकी खूप गळायला लागतात. ब्लो ड्रायरमुळे केसांतील सीबमची निर्मिती वाढते आणि मूळांतून तेल बाहेर येते, त्यामुळे केस तेलकट दिसायला लागतात. 

३. ओल्या केसांवर कंगवा वापरणे 

आवरायला उशीर झाला आणि घाईने कुठे बाहेर जायचे असेल तर आपण गडबडीत ओल्या केसांवरुनच कंगवा फिरवतो. असे केल्याने केस खराब होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे केसांच्या गळतीचे प्रमाणही खूप वाढते. त्यामुळे ओले केस आधी टॉवेलने पूर्ण कोरडे करावेत. त्यानंतर कंगव्याच्या ऐवजी हेअर ब्रशने केस सेट करावेत. पण शक्यतो ओल्या केसांवर कंगवा वापरु नये. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमोसमी पाऊस