Lokmat Sakhi >Beauty > बांगड्या हातात घट्ट झाल्या, चटकन काढता येत नाहीत? ‘या’ सोप्या ट्रिक्सने काढा एका झटक्यात

बांगड्या हातात घट्ट झाल्या, चटकन काढता येत नाहीत? ‘या’ सोप्या ट्रिक्सने काढा एका झटक्यात

महिलांना आपल्या कपड्यांसोबत मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. पण बऱ्याच वेळा बांगड्या जरा घट्ट असतात. कधी कधी महिला घाईघाईत त्या घालतात, मात्र नंतर त्या काढणं फार कठीण होऊन जातं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:36 IST2025-01-02T15:35:58+5:302025-01-02T15:36:27+5:30

महिलांना आपल्या कपड्यांसोबत मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. पण बऱ्याच वेळा बांगड्या जरा घट्ट असतात. कधी कधी महिला घाईघाईत त्या घालतात, मात्र नंतर त्या काढणं फार कठीण होऊन जातं.

how to take out tight bangles from wrist | बांगड्या हातात घट्ट झाल्या, चटकन काढता येत नाहीत? ‘या’ सोप्या ट्रिक्सने काढा एका झटक्यात

बांगड्या हातात घट्ट झाल्या, चटकन काढता येत नाहीत? ‘या’ सोप्या ट्रिक्सने काढा एका झटक्यात

सुंदर बांगड्या हाताचं सौंदर्य वाढवतात. महिलांना आपल्या कपड्यांसोबत मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. पण बऱ्याच वेळा बांगड्या जरा घट्ट असतात. कधी कधी महिला घाईघाईत त्या घालतात, मात्र नंतर त्या काढणं फार कठीण होऊन जातं. अनेक वेळा घट्ट बांगड्या हातात इतक्या वाईट पद्धतीने अडकतात की हात दुखू लागतो. तुम्हालाही ही समस्या होत असेल तर तुम्ही इंटरनेटवर व्हायरल होणारे हॅक तुम्ही करून पाहू शकता. हातात अडकलेली घट्ट बांगडी कशी काढायची? हे जाणून घेऊया...

प्लास्टिकची पिशवी 

तुमच्या हातातही बांगडी अडकली तर ती बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्लास्टिकची पिशवी वापरू शकता. यासाठी ज्या हातात बांगडी अडकली आहे त्या हातावर पिशवी घालावी. पिशवीचा कोपरा बांगडीच्या आत अडकवा. यानंतर पिशवीला कोणतंही तेल लावा. तेल लावल्यानंतर पिशवीचे कोपरे बांगडीत अडकवून ते बाहेर खेचा. त्यामुळे हातातून बांगडी सहज निघेल.

साबणाची घ्या मदत

जर बांगडी तुमच्या हातात अडकली असेल आणि तुम्हाला ती काळजीपूर्वक बाहेर काढायची असेल तर तुम्ही यासाठी साबणाची मदत घेऊ शकता. बांगडी अडकलेल्या मनगटाच्या भागापर्यंत हात ओला करा. यानंतर, आपल्या संपूर्ण हातावर भरपूर साबण लावा. अशा प्रकारे बांगडी हातातून सहज बाहेर निघते आणि हातही दुखणार नाही.

'या' हॅकचाही होईल फायदा

- हातावर कोणतंही तेल लावून घट्ट बांगड्या काढू शकता.

- क्रीम लूब्रिकेंट म्हणून काम करते. अशा परिस्थितीत तुम्ही हातावर कोणतीही क्रीम किंवा लोशन लावून बांगडी सहज काढू शकता.

- मनगटाला सूज आल्याने बांगडी अडकली असेल तर त्यावर बर्फाने शेकवा. यामुळे सूज कमी होईल आणि बांगडी काढणं सोपं होईल.
 

Web Title: how to take out tight bangles from wrist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.