Join us  

फेस वॅक्सिंग केल्यावर त्वचेची आग होते ? ४ सोपे उपाय, जळजळ - रॅशचा त्रास होणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 6:24 PM

How to Treat & Prevent Bumps After Waxing : फेस वॅक्सिंग केल्यानंतर अनेक स्किन प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून आधीच थोडी खबरदारी घेणे आवश्यक असते...

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग हाच उत्तम पर्याय मानला जातो. हात, पाय किंवा इतर अवयवांवरील केस काढण्यासाठी हा पर्याय योग्य आहे.  परंतु अनेकजणी चेहेऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी देखील वॅक्सिंग करून घेतात. काहीजणींच्या हनुवटी, ओठांच्या वरच्या भागावर, कपाळावर, गालावर भरपूर केस असतात. चेहऱ्यावर असे अनावश्यक केस आले तर चेहऱ्याचे सौंदर्य हरवून चेहरा विद्रुप दिसतो. असे होऊ नये म्हणून अनेकजणी चेहेऱ्यावर देखील वॅक्सिंग करण्याचा पर्याय अगदी बिनधास्तपणे निवडतात. परंतु आपल्या चेहऱ्याची त्वचा ही शरीराच्या त्वचेच्या तुलनेत १० पट नाजूक असते. त्यामुळे चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग करणे हे हा पर्याय हानिकारक ठरु शकतो. फेस वॅक्सिंग करताना प्रचंड वेदना तर होतात पण यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम्स (HOW TO PREVENT PIMPLES AFTER WAXING) देखील होतात. फेस वॅक्सिंग केल्यानंतर असे स्किन प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून आधीच थोडी खबरदारी घेणे आवश्यक असते(How to Prevent and Cure Post Facial Waxing Bumps).  

फेस वॅक्सिंग करताना चेहऱ्यावर वॅक्स लावून त्यावर स्ट्रिप्स लावून जोरात खेचले जाते व नको असलेले केस काढले जातात. मात्र त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, रॅशेस, खाज येणे, जळजळणे आणि वेदना होणे अशी (Tips For Preventing Pimples After Waxing) लक्षणे दिसू लागतात. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर त्यांना ही समस्या आणखी त्रास देऊ शकते. चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी, आपण नवीन प्रॉडक्ट्स वापरण्यास सुरुवात करतो. परंतु त्यामुळे त्वचा आणखी खराब होऊ लागते. फेस वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता(How to Treat and Prevent Pimples After Waxing).

फेस वॅक्सिंग केल्यावर स्किन प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून काय करावे ? 

१. काकडीचा वापर करून कोल्ड कॉम्प्रेस ट्रिटमेंट :- फेस वॅक्सिंग केल्यावर स्किन आतून गरम होते. त्याचप्रमाणे त्वचेवरील केस काढल्यामुळे त्वचेची छिद्र आकाराने मोठी होतात. यासाठी तुम्ही चेहऱ्यावर कोल्ड कॉम्प्रेस ट्रिटमेंट करू शकता. चेहऱ्यावर कोल्ड कॉम्प्रेस ट्रिटमेंट करण्यासाठी काकडीचा बारीक किस करून घ्यावा. हा काकडीचा किस घेऊन त्यात किंचित पाणी मिक्स करून बर्फ बनवण्याच्या ट्रे मध्ये हे मिश्रण घालून फ्रिजरमध्ये ठेवावे. या काकडीच्या मिश्रणाचे बर्फाच्या खड्यासारखे क्यूब बनवून घ्यावे. फेस वॅक्सिंग केल्यानंतर जर आपली त्वचा जळजळ करत असेल तर हा क्यूब चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे त्वचेचा दाह व जळजळ कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी काकडीचा वापर करणे फायदेशीर ठरते. अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हे क्युब्स चेहऱ्याला लावून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

आंघोळ केल्यावर डोळे लालबुंद होतात ? ही असू शकतात कारणं, करा सोपे ४ उपाय... 

२. एलोवेरा जेल वापरा :- फेस वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुम्हाला लालसरपणा किंवा सूज दिसत असेल तर तुम्ही  एलोवेरा जेलचा वापर करु शकता. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्यामुळे त्वचेलाही थंडावा मिळतो. तसेच त्यातील अँटीसेप्टिक घटकांमुळे सूज आणि पुरळ यापासून आराम मिळतो. एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यानंतर ते किमान १० मिनिटांसाठी असेच त्वचेला लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. 

फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...

३. गुलाबपाणी वापरा :- वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात. चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर छिद्रे उघडी पडतात त्याचबरोबर त्यांचा आकार देखील काहीसा मोठा होतो. वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरील या छिद्रांचा आकार मोठा होऊ नये म्हणून गुलाबपाणी लावावे. कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी घेऊन किंवा थेट चेहऱ्यावर स्प्रे करून अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही गुलाबपाणी लावू शकता. गुलाबपाणी हे चेहऱ्यासाठी टोनरप्रमाणे काम करते. वॅक्सिंगनंतर  चेहऱ्याचा लालसरपणा कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते. गुलाबपाणी थंड करून लावल्यास त्वचेची पीएच लेव्हल सुधारण्यास मदत होते. 

४. हळद आणि मध :- वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लालसर झाली असेल तर मध व हळदीचा लेप लावा. या दोहोंमध्येही अँटीबॅक्टेरिअल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. सूज व वेदना कमी करण्यासाठी हा लेप थोडा वेळा लावून ठेवा. साधारण अर्ध्या तासाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्हींचे पोषण देणारा आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय... 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी