Lokmat Sakhi >Beauty > कोंडा होतो म्हणून सारखं तेल लावता? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, असं करणं बरोबर की चूक...

कोंडा होतो म्हणून सारखं तेल लावता? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, असं करणं बरोबर की चूक...

How To Treat Dandruff Correctly Expert Advice : कोंडा कमी होण्यासाठी नेमकं काय करावं याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 03:21 PM2023-01-01T15:21:20+5:302023-01-01T15:26:10+5:30

How To Treat Dandruff Correctly Expert Advice : कोंडा कमी होण्यासाठी नेमकं काय करावं याविषयी...

How To Treat Dandruff Correctly Expert Advice : Do you apply oil like dandruff? Dermatologist says, right or wrong to do this... | कोंडा होतो म्हणून सारखं तेल लावता? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, असं करणं बरोबर की चूक...

कोंडा होतो म्हणून सारखं तेल लावता? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, असं करणं बरोबर की चूक...

Highlightsशाम्पू केसांना लावून तो ३ ते ५ मिनीटे तसाच ठेवावा आणि मग केस पाण्याने धुवावेत.कोंडा कमी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो

कोंडा ही बहुतांश लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची समस्या असते. अगदी लहान मुलांपासून ते तरुण आणि मध्यमवयीन, वयस्कर महिला आणि पुरुष डोक्यातील कोंडा या समस्येने हैराण असतात. केसातला कोंडा कमी करण्यासाठी काहीवेळी घरगुती उपाय केले जातात तर काही वेळा महागाची उत्पादने वापरुन किंवा पार्लरच्या ट्रीटमेंट घेऊन हा कोंडा कमी करावा लागतो. काही वेळा कोंडा कमी होण्यासाठी आपण शाम्पू बदलतो तरीही हा कोंडा कमी होत नाही. अशावेळी त्वचारोगतज्ज्ञांकडे जाणे हा सगळ्यात शेवटचा पर्याय असतो. कोंडा कमी होण्यासाठी नेमके काय करायला हवे याविषयी प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आचल पंथ काही महत्त्वाची माहिती आपल्यासोबत शेअर करतात. पाहूयात हे उपाय कोणते आणि त्याचा कसा फायदा होतो (How To Treat Dandruff Correctly Expert Advice)...

तेल लावावं की नाही? 

थंडीच्या दिवसांत कोंड्याची समस्या वाढते. अशावेळी त्वचा कोरडी पडली म्हणून आपण जास्त प्रमाणात तेल लावतो. पण याचा उपयोग न होता तोटा होतो. डॉ. आंचल सांगतात, केसांत कोंडा असेल तर अजिबात तेलाचा वापर करु नये. त्यामुळे कोंडा वाढण्याची आणि डोक्यात खाज येण्याची शक्यता असते. 

(Image : Google)
(Image : Google)


केस किती वेळा कसे धुवावेत? 

ज्यांना कोंड्याचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून १ किंवा २ वेळा केस न धुता दर एक दिवसाने केस धुवायला हवेत. पण तुमचं काम खूप फिरण्याचे किंवा घामाघूम करणारे असेल तर तुम्ही रोज केस धुतले तरी चांगले. यामुळे केसांची मुळे स्वच्छ राहण्यास मदत होते आणि केसातला कोंडा कमी होतो. 

कोंडा असेल तर आपण वापरत असलेल्या शाम्पूमध्ये असायलाच हवेत हे घटक...

१. किटोकोनाझोल (Ketoconazole)
२. झिंक पायरीथियॉन (Zinc Pyrithione)
३. सायक्लोपायरोक्स (Ciclopirox)
४. पायरोक्टो ओलामिन (Pyroctone Olamine)
५. सिलेनियम सल्फाईड (Selenium Sulfide)
६. कोल टार (Coal Tar)

तसेच शाम्पू हातावर घेऊन आपण तो केसांना आणि मुळांना लावतो. मग तो चोळून झाल्यावर त्याचा फेस होतो. मग आपण लगेचच पाण्याने केस धुवून टाकतो, मात्र असे करणे योग्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाम्पू केसांना लावून तो ३ ते ५ मिनीटे तसाच ठेवावा आणि मग केस पाण्याने धुवावेत. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. 

Web Title: How To Treat Dandruff Correctly Expert Advice : Do you apply oil like dandruff? Dermatologist says, right or wrong to do this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.