त्वचेची काळजी घेताना अनेकदा ओठांकडे दुर्लक्ष होते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर टॅन होणे, कोरडी पडणे यांसारख्या समस्या होतात तसेच ओठांचे देखील असते. (Best Home Remedies for Dark Lips) ओठ सुंदर दिसावे यासाठी अनेकजण लिपस्टिक वापरतात. परंतु, लिपस्टिक लावल्यानंतर अनेकवेळा ओठ फुटलेले किंवा त्याच्यावर असणारी डेड स्किन निघू लागते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे संपूर्ण सौंदर्य खराब दिसू लागते. (How to Lighten Dark Lips Naturally)
काळपट, कोरड्या ओठांवर लिपस्टिकही व्यवस्थित सेट होत नाही. कधीकधी ओठांच्या काळेपणामुळे आपल्या चेहरा खराब दिसतो.(Top Lip Care Tips for Soft & Pink Lips) ओठ काळे होण्याची अनेक कारणे आहेत जसे की, खराब जीवनशैली, जास्त थकवा किंवा मादक पदार्थांचे सेवन.(Hydrating Lip Care Routine for Dark Lips) जर आपले ओठही सतत काळपट होत असतील तर या सोप्या घरगुती उपायांचा वापर करुन ओठांना सुंदर मुलायम बनवू शकतो. (How to Treat Chapped and Dark Lips at Home)
आयब्रो - पापण्या जाड, दाटसर हवेत? झोपण्यापूर्वी तेलाचा 'असा' करा वापर, डोळे होतील सुंदर
1. नारळाचे तेल आणि साखर
ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी आपण नारळाचे तेल आणि साखरेचा स्क्रब तयार करु शकता. याने आपले ओठ नियमितपणे घासून घ्या. ओठांचा काळेपणा दूर करण्यास आणि त्यांना मॉइश्चरायझ होण्यास मदत होईल.
2. गुलाबाच्या पाकळ्या
आपले ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर आपण करु शकतो. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करुन ओठांवर काही मिनिटे लावून ठेवा, नंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवा. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे तुमचे ओठ गुलाबी आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते.
3. लिंबू आणि मध
काळ्या ओठांवर आपण लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन त्याचे मिश्रण लावू शकतो. लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. जे तुमचे ओठ गुलाबी करण्यास मदत करेल. तर मध आपल्या ओठांना मॉइश्चरायझ करण्यास फायदेशीर ठरेल.
4. बीटाचा रस
जर आपले ओठ स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या गुलाबी करायचे असतील तर ओठांवर बीटाचा रस लावा. बीटामध्ये बीटालाइन नावाचे रंगद्रव्य असते जे आपले ओठ गुलाबी आणि चमकदार बनवण्यास मदत करते. तसेच ओठांना हायड्रेटही ठेवते.