Lokmat Sakhi >Beauty > माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

How to Treat Hair Loss at the Crown केसांची समस्या सामान्य जरी असली तरी, त्याची ग्रोथ थांबता कामा नये, यासाठी काही उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2023 01:52 PM2023-04-23T13:52:15+5:302023-04-23T13:53:10+5:30

How to Treat Hair Loss at the Crown केसांची समस्या सामान्य जरी असली तरी, त्याची ग्रोथ थांबता कामा नये, यासाठी काही उपाय..

How to Treat Hair Loss at the Crown | माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

वयानुसार केसांच्या वॉल्यूममध्ये फरक पडतो. केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. अधिकतर लोकांचे माथ्यावरील केस कमी होतात, किंवा त्या ठिकाणी केस गळतीची समस्या निर्माण होते. माथ्यावरील केस गळतीमुळे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होते. ही समस्या अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. काही लोकं केसांवर प्रयोग करून पाहतात, काही हेअर ट्रीटमेंट करून घेतात, तर काही लोकं विविध हेअर स्टाईल करतात.

त्यामुळेही माथ्यावरील केसांची गळती होते, व टक्कल पडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध उपाय करून पाहतात. महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा ४ घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे केसांवर नक्कीच फरक दिसेल(How to Treat Hair Loss at the Crown).

गुणकारी आवळा करेल मदत

केसांच्या वाढीसाठी आवळा बहुगुणी मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे केसांच्या वाढीस मदत करते. यामध्ये असलेले एन्झाइम्स आपल्या केसांची वाढीस मदत करतात. सर्वप्रथम, आवळा पाण्यात उकळवत ठेवा, आवळा शिजल्यानंतर त्याची साल व आतला गर वेगळा करा. हा पल्प कुस्कुरून घ्या, व त्यात एसेंशियल ऑईल मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांवर लावा, व अर्ध्या तासानंतर सामान्य पाण्याने केस धुवा. याने केसांची समस्या कमी होईल.

दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

शिकाकाई

शिकाकाई ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक घटक असतात. जे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंटने समृद्ध औषधी वनस्पती त्वचेवर देखील गुणकारी ठरते. याचा वापर करण्यासाठी प्रथम,  एका वाटीत पाणी घ्या, त्यात दोन चमचा शिकाकाई पावडर मिक्स करा. ही पेस्ट रात्रभर किंवा ८ तासांसाठी ठेवा. आता ही पेस्ट केसांवर लावा, व १२ तासानंतर केस धुवा. यात आपण दही, एलोवेरा जेल, खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता.

मध

मधाचा वापर त्वचा व केसांसाठी अधिक प्रमाणावर होतो. मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांसाठी फायदेशीर असतात. यासाठी एका वाटीत मध, दुध व ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा. काही वेळानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामुळे केसांचा पोत सुधारतो. व केसांची ग्रोथ होईल.

उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

मेथी दाणे

जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमने भरपूर मेथी दाण्यांचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. लोहयुक्त मेथी दाणे केसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. यासाठी २ चमचे मेथी दाणे व २ चमचे काळे तीळ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळापर्यंत लावा. ३ तासानंतर केस माईल्ड शाम्पू धुवा.

Web Title: How to Treat Hair Loss at the Crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.