Join us  

कमी वयात केस फार पिकलेत? मेंहेदीत ४ पदार्थ मिसळून लावा हेअरमास्क, वाढ होईल चांगली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 2:59 PM

How to turn grey hair into black : मेहेंदीत काही पदार्थ मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केसांना चांगलं पोषण मिळेल आणि दुप्पट वेगानं वाढतील. (How to turn grey hair into black)

एकही पांढरा केस नाही दिसणार; मेंहेदीत ४ पदार्थ मिसळून लावा हेअरमास्क, वाढ होईल चांगलीकेस काळे असो किंवा पांढरे लोक केस काळे करण्यासाठी मेहेंदीची निवड करतात. (Natural Home Remedies For Grey Hair) हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला केमिकल्सयुक्त हेअर डाय लावण्याची गरजच पडणार नाही. मेहेंदीत काही पदार्थ मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केसांना चांगलं पोषण मिळेल आणि दुप्पट वेगानं वाढतील. (How to turn grey hair into black)

मेहेंदीमुळे डोक्यातील कोंडा आणि केस गळण्याची समस्या कमी होते. यामध्ये आढळणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळूला संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात, परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला मेहेंदीमध्ये काय मिक्स करावे आणि ती लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे सांगणार आहोत.

सगळ्यात आधी एक पाकीट हिना मेहेंदी घ्या. एका लहानश्या वाटीत  ही मेहेंदी काढून बाजूला ठेवून द्या. मग एक चमचा कॉफी, एक चमचा चहा पावडर आणि १० ते १५ कढीपत्ते घ्या. एक ग्लास पाणी भांड्यामध्ये घालून उकळण्यासाठी ठेवा त्यात हे वरचं साहित्य घालून उकळू द्या. पाणी उकळ्यानंतर गाळून  घ्या. त्यात मेहेंदी मिसळून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

सुरकुत्या, बारीक रेषांमुळे चेहरा वयस्कर दिसतो? २ घरगुती फेसपॅक वापरा- कायम दिसाल तरूण

यात तुम्ही १ अंडसुद्धा घालू शकता. याची पेस्ट रात्रभर झाकून ठेवून द्या. सकाळी केसांना ही पेस्ट लावा आणि ३ तासांनी केस स्वच्छ धुवून टाका. नंतर तुम्हाला मऊ,मुलायम चकदार केस दिसतील.  हा उपाय तुम्ही १५ ते २० दिवस करून खराब झालेले केस पुन्हा चांगले करू शकता.

जेव्हाही तुम्हाला केसांना मेहेंदी लावायची असेल तेव्हा एक दिवस आधी कोमट तेलाने केसांची आणि टाळूची चांगली मालिश करा. यासाठी तुम्ही केसांचे कोणतेही तेल घेऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की ते थेट गरम करू नका.  डबल बॉयलर पद्धतीने तेल गरम करा. असे केल्याने केस मजबूत आणि घट्ट होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवा आणि नंतर मेहेंदी लावा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स