Lokmat Sakhi >Beauty > केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस

केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस

How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : केसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि केसांचा टेक्चर सुधारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:06 AM2024-03-18T11:06:59+5:302024-03-18T11:16:33+5:30

How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : केसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि केसांचा टेक्चर सुधारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : White Hair To Black Naturally Permanent Using Turmeric | केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस

केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस

वाढत्या वयात महिलांसह पुरूषांचेही केस पांढरे  होऊ लागतात. (Grey Hairs Solution) पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी नेहमीच लोक डाय किंवा हेअर कलरचा आधार घेतात. पण यामुळे केसांचा ड्रायनेस वाढू शकतो ज्यामुळे स्काल्पला काळा रंग येतो. डोक्यावर मेहेंदी लावल्याने केसांचा टेक्स्चर सुधारण्यास मदत होते. (White Hair To Black Naturally Permanent Using Turmeric) अनेकदा मेहेंदी लावल्याने केस काळे होण्याऐवजी पांढरे होतात. केसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि केसांचा टेक्चर सुधारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीचा वापर केसांवर केल्याने काय परिणाम होतो ते समजून घेऊया. (How to turn Grey Hair To Black Hair Naturally)

1) हळद आणि नारळाचे तेल

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही हळदीत नारळाचं तेल मिसळून केसांना लावू शकता. याचा हेअर मास्कही केसांना लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी  कच्च्या हळदीचे २ तुकडे घेऊन ते वाटून घ्या. नंतर एका वाटीत नारळाचे तेल घेऊन गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हळद मिसळा. हळदीचे मिश्रण हलकं गरम करून केसांना  १५ ते २० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. आठवड्यातून एकदा हळद केसांना लावल्यास केस काळेभोर राहतील. 

केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस

2) हळदीचा स्प्रे

केसांवर तुम्ही हळदीचा स्प्रे सुद्धा लावू शकता. यासाठी १ कप पाण्यात १ चमचा हळद आणि थोडं एलोवेरा जेल मिसळा त्यानंतर बॉटल व्यवस्थित शेक करा त्यानंतर पाण्याने मुळांपासून डोक्यापर्यंत स्प्रे करा.  केसांवर कमीत कमी एक तास हा स्प्रे लावून ठेवा त्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. या उपायाने केस काळे होण्यास मदत होईल आणि केस चमकदार होतील.

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

3) हळदीचा शॅम्पू

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी हळदीचा शॅम्पू हा उत्तम पर्याय आहे. हा शॅम्पू तयार करण्यासाठी २ चमचे हळदीत १ चमचा मध आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस धुण्यासाठी वापरा. ही पेस्ट तम्ही हेअर मास्कप्रमाणे लावू शकता.  २० ते २५ केसांवर लावून ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे स्काल्पवरून  कोंडा दूर होण्यास मदत होते आणि पांढरे केस काळेभोर राहतात. 

Web Title: How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : White Hair To Black Naturally Permanent Using Turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.