कमी वयातच केस पिकलेत अशी तक्रार अनेक तरूण-तरूणींची असते. (Hair Care Tips) एकदा केस पिकायला सुरूवात झाली की ते आयुष्यभर ठराविक अंतरानंतर वेगानं पिकायला लागतात. केसांवर हेअर डाय किंवा वेगवेगळ्या हेअर क्रिम्स वापरूनही हवातसा बदल होत नाही. काहीजण केसांवर हेअर डाय लावणं टाळतात. (Can grey hair be turned black naturally)
डाय लावल्यानंतर केस वारंवार जास्त पांढरे होतील अशी भिती त्यांच्या मनात असते. काही घरगुती उपाय पांढरे केस काळे करण्यास मदत करू शकतात. घरगुती उपायांचा एक फायदा म्हणजे कोणतेही साईट इफेक्ट दिसत नाहीत. कमीत कमी खर्चात चांगले परिणाम दिसून येतात. (How to Turn Grey Hair to Black Naturally)
केस पांढरे का होतात?
दूषित हवा आणि भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने केस वयाच्या आधी पांढरे होतात. म्हातारे दिसू नये म्हणून आपण केसांना रंग देऊ लागतो. केसांना डाय केल्याने केस कोरडे, निर्जीव तसेच पूर्वीपेक्षा जास्त पांढरे दिसतात. केसांना सुंदर बनवण्यासाठी आजकाल प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, कंडिशनर किंवा हेअर प्रोडक्ट्स वापरतो.
जर तुम्ही कमीत कमी केसांची उत्पादने वापरली तर तुमचे केस अकाली पांढरे होणे टाळू शकतात. अनेक केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्स वापरल्याने केस मुळापासून कमकुवत होतात. अशा चुकांमुळे वयाआधीच आपले केस पांढरे होऊ शकतात. हायलाईट, ग्लोबल कलर, स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग अशा ट्रिटमेंट्स आणि हिटींग टुल्सचा वापर केस कमी वयात पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात.
काळ्या केसांसाठी मेहेंदीचा वापर कसा करायचा?
एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात २ चमचे चहा पावडर आणि कॉफी पावडर, काठा पावडर घालून उकळून घ्या. हे पाणी हिना मेहेंदी पावडरमध्ये घाला. पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून मिश्रण झाकून ठेवा. एकजीव झाल्यानंतर या मिश्रणात पुन्हा कॉफी पावडर घाला. मेहेंदीचे मिश्रण केसांना व्यवस्थित लावा. अर्धा तास ते ४५ मिनिटं तसंच ठेवून केस स्वच्छ धुवा.