Lokmat Sakhi >Beauty > केस खूपच पांढरे झालेत? ३ पदार्थांचा घरीच बनवा डाय; केमिकल्स न वापरता केस होतील काळेभोर

केस खूपच पांढरे झालेत? ३ पदार्थांचा घरीच बनवा डाय; केमिकल्स न वापरता केस होतील काळेभोर

How to turn grey hairs into black : डाय न वापरता काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 02:41 PM2023-06-12T14:41:56+5:302023-06-12T16:02:29+5:30

How to turn grey hairs into black : डाय न वापरता काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात

How to turn grey hairs into black : Natural 3 Home remedies for grey hairs | केस खूपच पांढरे झालेत? ३ पदार्थांचा घरीच बनवा डाय; केमिकल्स न वापरता केस होतील काळेभोर

केस खूपच पांढरे झालेत? ३ पदार्थांचा घरीच बनवा डाय; केमिकल्स न वापरता केस होतील काळेभोर

काळ्या केसांमध्ये पांढरे केस दिसू लागले की लगेचच डाय लावण्याची लोकांची तयारी असते तर काहीजण केस काळे करण्याचं तेल वापरतात. (Hair Care Tips) पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. पण डाय किंवा कलर करण्याबाबत एक भिती लोकांच्या मनात असते. केमिकल्सयुक्त डायमुळे केस ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा पांढरे होऊ लागतात.  कान आणि कपाळावरही काळा रंग दिसून येतो. (How to turn grey hairs into black)

अशावेळी डाय न वापरता काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पांढरे केस पुन्हा काळे होण्यास मदत होऊ शकते. केसांच्या  मुळांना पोषण मिळण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थ फायेदशीर ठरतात. घरगुती उपायांचा फायदा असा की त्यामुळे नैसर्गिकरिकत्या केस काळे होतात. केसांना मुळांपासून पोषण मिळाल्यानं केसाचं गळणंही थांबतं. (Natural 3 Home remedies for grey hairs)

कढीपत्ता

व्हिटामीन बी युक्त कढीपत्ता (Curry Leaves) हेअर फॉलिकल्सना सुधारण्यासाठी आणि पांढऱ्या केसांना काळे होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी ठरतो. कढीपत्त्याच्या वापरानं तुम्ही केस काळे होण्यापासून रोखू शकता. पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याचं तेल बनवावं लागेल. या तेलाच्या नियमित वापरानं केस मुळापासून काळे होण्यास मदत होते.

हे तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलात मुठभर कढीपत्ते घाला. त्यानंतर हे तेल गरम करून एक बरणीत भरून ठेवा. रात्रभर हे तेल केसांना लावून दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

इंडिओ पावडर आणि मेहेंदी

इंडिगो पावडर पावडर (Indigo Powder) मेहेंदीमध्ये मिसळून केसांना लावा. मेहेंदी भिजवून त्यात इडिंगो पावडर घाला ही पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा.  यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.

काळा चहा

पिकलेल्या केसांवर काळा चहा गुणकारी ठरतो. काळा चहा पाण्यात उकळून घ्या ठेवा. पाणी वेगळे करून २ तासांसाठी वेगळे ठेवून द्या. पाणी वेगळे करून त्यात भिजवलेली चहा पावडर वाटून घाला. ही  पेस्ट केसांवर लावा. ३० ते ४० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.  कंडिशनर लावल्यानंतर काळ्या चहाच्या पाण्यानं केस धुवा. यामुळे केसांचा रंग अधिक गडद होईल.

Web Title: How to turn grey hairs into black : Natural 3 Home remedies for grey hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.