Join us  

पांढऱ्या केसांमुळे कमी वयात म्हातारे दिसताय? ८ पदार्थ रोज खा- पिकलेल्या केसांचं बेस्ट सोल्यूशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:38 PM

How to Turn Grey Hairs to Black : केस पांढरे होऊ नयेत यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर फायदा होऊ शकतो. (How to turn grey hairs to black)

तरूणपणात केस पांढरे दिसत असतील तर आत्मविश्वास कमी होतो. याशिवाय पांढरे केस काळे करण्यासाठी लोक केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करतात. डाय किंवा ग्लोबल हेअर कलरचा परिणाम जास्त दिवस टिकत नाही आणि केस पुन्हा पांढरे दिसू लागतात. (Can White Hair Turn Black Again) अन्हेल्दी लाईफस्टाईल, ताण-तणाव यामुळे कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. केस पांढरे होऊ नयेत यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर फायदा होऊ शकतो. (How to turn grey hairs to black)

१) काबुली चण्यांचा वापर छोले करण्यासाठी केला जातो. ही भारतातील एक फेमस डिश आहे. यात व्हिटामीन बी९चे प्रमाण भरपूर असते. काबूली चण्यांचे सेवन केल्यास केस चांगले राहण्यास मदत होते.

२) जस्त, लोह, मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे इत्यादी आवश्यक खनिजे केस निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या पदार्थांमध्ये आवश्यक असतात. जीवनसत्त्वे ,खनिजे फळे, हिरव्या पालेभाज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात असतात.

३) पांढऱ्या तिळापेक्षा काळे तीळ केसांसाठी जास्त फायदेशीर मानले जाते. हे तीळ केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतात आणि नैसर्गिकरित्या पांढरे केस पुन्हा काळे होण्यास मदत करते. आठवड्यातून २-३ वेळा एक चमचा काळे तीळ गूळ किंवा मधात मिसळून खाण्याचा प्रयत्न करा.

४) रोजच्या आहारात डाळींचा समावेश केल्यास शरीराप्रमाणेच केसांनाही पोषण मिळते. व्हिटामीन बी १२, व्हिटामीन ९ डिएनए आणि आरएनएच्या उत्पादनास मदत करते यामुळे केस काळेभोर होण्यासही महत होते.

नसांमधलं बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढतील रामदेव बाबांचे ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

५) अश्वगंधाचे सेवन फक्त केसांना हेल्दी ठेवत नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. अश्वगंधाचे पावडर, सप्लीमेंट्सचे दुधासह सेवन करता येते.

६) स्पिरुलिनामध्ये तांबे जास्त प्रमाणात आढळते. हे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

७) आले अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे आल्याचा चहा, आल्याच्या पाण्याचे नियमितपणे सेवन करा, 1 चमचे आले किसून किंवा किसून घेतल्यानंतर त्यात एक चमचा मध टाका.

८) आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या जवळपास सर्व समस्या दूर होतात. हे शरीरातील पित्त दोष देखील संतुलित करते, ज्यामुळे केस अकाली पांढरे होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी