Lokmat Sakhi >Beauty > कमी वयात केस पिकले? १० रूपयांच्या कढीपत्त्याने मिळवा काळेभोर केस, डायची गरजच नाही

कमी वयात केस पिकले? १० रूपयांच्या कढीपत्त्याने मिळवा काळेभोर केस, डायची गरजच नाही

How to Turn Grey or White Hair Black Naturally : . पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं असली तरी त्याच्या वापराबाबत मनात धाकधूक असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:14 PM2023-09-01T14:14:00+5:302023-09-01T16:33:48+5:30

How to Turn Grey or White Hair Black Naturally : . पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं असली तरी त्याच्या वापराबाबत मनात धाकधूक असते.

How to Turn Grey or White Hair Black Naturally : Easy Solutions to stop grey hair naturally | कमी वयात केस पिकले? १० रूपयांच्या कढीपत्त्याने मिळवा काळेभोर केस, डायची गरजच नाही

कमी वयात केस पिकले? १० रूपयांच्या कढीपत्त्याने मिळवा काळेभोर केस, डायची गरजच नाही

केस वेळेआधीच पांढरे झाल्यास आत्मविश्वास कमी होऊ लागतो. नको असलेले पांढरे केस लपवण्यासााठी बरेच प्रयत्न केले जातात. काळे लांब केस प्रत्येकालाच आवडतात. काळेभोर लांब लांब केस सुंदरता वाढवतात. तर पांढरे  केस दिसल्यानंतर आपण वयाआधीच म्हातारे होऊ लागलोय की काय असं वाटतं.  (Natural Home Remedies For Grey Hair) आजकाल तारूण्यातच मुला-मुलींचे केस पांढरे होता. पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं असली तरी त्याच्या वापराबाबत मनात धाकधूक असते. (How to Turn Grey or White Hair Black Naturally)

डाय केल्यानंतर थोडावेळ केस चांगले दिसतील नंतर जास्त पांढरे होतील, एकदा डाय केल्यानंतर ठराविक वेळाने सारखं करत राहावं लागणार असा अनेकांचा समज असतो. पुरूष असो किंवा स्त्री केस पांढरे होण्याचा त्रास सर्वांनाच उद्भवतो.  केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डाय वापरण्यापेक्षा तुम्ही स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करू शकता. (Easy Solutions to stop grey hair naturally)

कढीपत्ता

कढीत्त्याचा वापर केसांसाठी गुणकारी ठरतो. वेळेआधी पिकणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यसाठी कढीपत्ता उत्तम घरगुती उपाय आहे.  केस गळणं थांबवण्यापासून नवीन केस उगवण्यापर्यंत कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता नारळाचं तेल किंवा जोजोबा तेलात मिसळा. हे मिश्रण गरम  करा तेलाचा रंग काळपट झाल्यानंतर गॅस बंद करा.  हे तेल थंड झाल्यानंतर  गाळून एका बरणीत भरा आणि स्काल्पवर लावा. चांगल्या परिणामांसाठी रात्रभर हे तेल  लावलेले राहू द्या.

आवळा

आवळ्या पांढऱ्या केसांसाठी एखाद्या औषधाप्रमाणे असतो. हा एक केसांसाठी हर्बल उपचार आहे. एंटी ऑक्सिडेंटनी  परिपूर्ण असून यात अनेक एंटी एजिंग गुणधर्म आहेत आवळा पावडर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल.  सगळ्यात आधी आवळ्याचा रस एका भांड्यात काढा त्यात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण आपल्या स्काल्पवर लावा आणि ३० मिनिटं तसंच सोडून द्या. कोमट पाण्याने केस धुवा. केस मऊ टॉवेल पुसून घ्या. ही पावडर नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईलसह मिसळून लावा. हे मिश्रण  तेलाचा रंग बदलेपर्यंत गरम करा आणि स्काल्पवर लावून मसाज करा. 

काळा चहा

काळ्या चहामध्ये टॅनिक एसिड असते. ज्यामुळे केस काळे आणि चमकदार राहतात. तुम्ही काही दिवस हा उपाय करून पाहू शकता. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. हा उपाय करण्यासाठी  २ चमचे चहा पावडर घ्या. बिना सारखेरचा चहा बनवा. लावण्याआधी थंड करा.  स्वच्छ आणि ओल्या केसांवर हा चहाचे पाणी लावा. कमीत कमी ३० मिनिटं ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवा.

Web Title: How to Turn Grey or White Hair Black Naturally : Easy Solutions to stop grey hair naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.