Join us  

केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:56 AM

​How to turn white hair into black : केस पांढरे झाल्यानं काहीजणांचा आत्मविश्वास कमी होतो तर पर्सनॅलिटीवरही याचा परिणाम होत असतो.

केसांवर केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वाढता वापर, सतत टेंशनमध्ये असणं. यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या तरूण तरूणींमध्ये जाणवतेय म्हणजेच कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहेत. केस पांढरे झाल्यानं काहीजणांचा आत्मविश्वास कमी होतो तर पर्सनॅलिटीवरही याचा परिणाम होत असतो. साधारणपणे वयस्कर किंवा मध्यम वयाचे लोक केस काळे करण्यासाठी डायचा वापरतात. एकदा डाय केले की  ठराविक दिवसांनंतर पुन्हा डाय  करावी लागते. (​Mix these things in Henna to get jet black hair)

अन्यथा केस परत पांढरे होऊ लागतात. केस  काळे करण्यासाठी बरीच तेलं ही बाजारात उपलब्ध आहेत पण त्याचा हवातसा परिणाम दिसून येत नाही.   मेहेंदीचा वापर केस काळे करण्यासाठी पूर्वापार केला जात आहे. मेहेंदीत काही घरगुती पदार्थ मिसळल्यास काळेभोर केस मिळवण्यास मदत होऊ शकते. केस दाट, सुंदरही दिसतात. (How to turn white hair into black)

साहित्य

काळ्या बिया (कलोंजी) - 1 टीस्पून

काळा चहा - 1 टीस्पून

तांदूळ - 1 टीस्पून

अंडी - १

दही - 2 चमचे

मेहेंदी - १ कप

सगळ्यात आधी एका भांड्यात १ ग्लास पाणी गरम करण्यासाठी  ठेवा. त्यात १ चमचा ब्लॅक सिड्स (कलोंजी) घाला,१ चमचा चहा पावडर आणि १ चमचा तांदूळ घालून उकळू द्या. हिना मेहेंदी एका खोलगट भांड्यात काढून त्यात अंड घाला. अंड घालायचं नसेल तर तुम्ही दही किंवा कांद्याचा रस घालू शकता. 

२ चमचे दही घातल्यानंतर त्यात उकळवलेलं पाणी घाला व्यवस्थित एकजीव करून हे मिश्रण १ तासासाठी  झाकून ठेवून द्या. एक तासानंतर हे मिश्रण  केसांना व्यवस्थित लावा. केसांना हे मिश्रण लावल्यानंतर १ तासाने केस स्वच्छ पाण्यानं धुवा.  हा उपाय आठवड्यातून दोनवेळा केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. 

चहाच्या पावडरमधले पोषक घटक केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. विशेषत: आठवड्यातून दोनदा  चहाच्या पाण्याने केस धुतल्यास केस गळणे, तुटणे आणि फुटणे या समस्यांपासून आराम मिळू शकतो. चहाच्या पानांमध्ये असणारा नैसर्गिक काळा रंग पांढरे केस दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ज्या लोकांना अकाली केस पांढरे होतात त्यांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा चहाच्या पानांचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी