त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपैकी सगळ्यात कॉमन असणारी एक समस्या म्हणजे स्किनवरील ओपन पोर्स. आपल्या त्वचेवर लहान छिद्र असतात. ही छिद्रे त्वचेचे नैसर्गिक तेल आणि घाम बाहेर टाकण्यास मदत करतात. या छिद्रांमधून आपली त्वचा श्वास घेत असते. जेव्हा ही छिद्रे मोठी होतात तेव्हा त्याला ओपन पोर्स म्हणतात. त्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते आणि त्वचेचे सौंदर्यही कमी होते. ओपन पोर्सची समस्या आपल्यापैकी अनेकजणींना सतावते. त्वचेवर ओपन पोर्स असल्यामुळे त्यात धूळ, माती, धूलिकण जाऊन अडकतात. ज्यामुळे हे ओपन पोर्स संपूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. यामुळे त्वचा अधिकच खराब दिसू लागते. एवढेच नाही तर आपली त्वचा नीट श्वास घेऊ शकत नाही यामुळे अनेक स्किन प्रॉब्लेम्स देखील होऊ शकतात(how to use a honey & coffee face mask to treat open pore).
ही ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु काहीवेळा याचा काहीच फायदा होत नाही. अशावेळी आपण एका खास कोरियन उपायाचा (How to Treat Large Facial Open Pores) वापर करून शकतो. या कोरियन उपायामध्ये आपण फक्त २ पदार्थांचा वापर करून हे ओपन पोर्स अगदी सहजपणे क्लीन करु शकतो. ओपन पोर्स वेळच्यावेळी स्वच्छ करणे तितकेच महत्वाचे असते. यासाठीच आपण हा खास कोरियन उपाय घरच्याघरी नक्की करुन पाहू शकता(Simple Way to Get Rid of Large Open Pores).
ओपन पोर्स स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. मध२. कॉफी
ओपन पोर्स स्वच्छ करण्यासाठी खास उपाय :-
१. एका बाऊलमध्ये अर्धा टेबलस्पून कॉफी पावडर घेऊन त्यात दोन टेबलस्पून मध घालावे. २. बाऊलमधील हे दोन्ही पदार्थ चमच्याने ढवळून एकत्रित मिक्स करुन घ्यावेत. ३. आता हा तयार फेसपॅक त्वचेवरील ओपन पोर्सवर लावून घ्यावा. ४. त्यानंतर आपण ५ मिनटे हलक्या हातांनी थोडासा दाब देत मसाज देखील करु शकता. ५. त्वचेवर असणाऱ्या ओपन पोर्सवर हा फेसपॅक एखाद्या स्क्रब प्रमाणे उपयुक्त ठरेल. ६. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हा फेसपॅक त्वचेवर असाच लावून ठेवावा. ७. १५ मिनिटानंतर कापसाचा बोळा आणि पाण्याच्या मदतीने त्वचेवरील हा फेसपॅक काढून घ्यावा. ८. हा फेसपॅक आपण त्वचेवर आठवड्यातून २ ते ३ वेळा लावून त्वचेवरील ओपन पोर्स स्वच्छ करु शकता.
मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस गळतील - होईल नुकसान...
त्वचेवर कॉफी लावण्याचे फायदे...
१. त्वचेवरील छिद्र खोलवर साफ करण्यास मदत करते.२. त्वचेचे टॅनिंग काढून टाकण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरते. ३. कॉफी त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी फायदेशीर असते. ४. कॉफी त्वचेवर नॅचरल स्क्रब प्रमाणे काम करते.
त्वचेवर मध लावण्याचे फायदे...
१. मधामुळे त्वचेवरील ओपन पोर्स साफ करण्यास मदत होते.२. त्वचा मऊ ठेवण्यासाठी मध खूप उपयुक्त ठरते.३. त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.