Lokmat Sakhi >Beauty > केसांपासून पोटापर्यंत अनेक समस्यांवर १ खास उपाय, भिजवलेल्या बदामाच्या सालींचा 'असा ' करा वापर...

केसांपासून पोटापर्यंत अनेक समस्यांवर १ खास उपाय, भिजवलेल्या बदामाच्या सालींचा 'असा ' करा वापर...

How to use almond peels and their benefits : भिजवलेल्या बदामाच्या सालींचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2024 06:34 PM2024-08-06T18:34:10+5:302024-08-06T18:44:03+5:30

How to use almond peels and their benefits : भिजवलेल्या बदामाच्या सालींचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात.

how to use almond peels and their benefits Don’t throw almond peel, here are some genius ways to reuse them | केसांपासून पोटापर्यंत अनेक समस्यांवर १ खास उपाय, भिजवलेल्या बदामाच्या सालींचा 'असा ' करा वापर...

केसांपासून पोटापर्यंत अनेक समस्यांवर १ खास उपाय, भिजवलेल्या बदामाच्या सालींचा 'असा ' करा वापर...

बदाम खाल्ल्याने आपल्या आरोग्याला त्याचे अनेक चांगले फायदे मिळतात. बदाम आपण कोरडे किंवा भिजवून अशा दोन्ही पद्धतींनी खातो. परंतु यात बदाम भिजवून खाणं जास्त फायदेशीर ठरते. बदाम भिजवून त्याची साल काढून खाणे ही पारंपारिक पद्धत आहे. भिजवलेले बदाम सोलून खाताना बदामाची सालं मात्र निरुपयोगी म्हणून फेकून दिली जातात. पण त्वचेच्या, केसांच्या आरोग्यासाठी, दातांसाठी बदामाच्या सालींचा चांगला उपयोग होतो(how to use almond peels and their benefits).

बदामाप्रमाणेच बदामाच्या सालींमध्ये जीवनसत्व, खनिजे, अँटिऑक्सिडंट हे महत्वाचे घटक असतात. हे घटक केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी महत्वाचे असतात. यासाठीच बदाम भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, पोषणासाठी बदाम अवश्य भिजवून खावेत. मात्र सोलताना त्याची सालं कचरापेटीत टाकू नये. बदामाच्या सालींचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात(Don’t throw almond peel, here are some genius ways to reuse them). 

बदामांच्या सालींचा असा करा वापर... 

१. हेअर मास्क :- बदामाच्या सालींचा हेअर मास्क बनवण्यासाठी १/२ कप बदामाच्या साली घेऊन त्यात १ टेबलस्पून खोबरेल तेल, २ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि मध मिसळा. हे मिश्रण गाळणीने गाळून  तयार होणारी पेस्ट केसांना लावा. बदामाच्या सालींचा हा हेअर मास्क आपल्या केसांवर स्पासारखे काम करेल कारण त्यात व्हिटॅमिन 'ई' चे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. 

२. स्नॅक म्हणून खा :- १ कप बदामाची साले घ्या, ती नीट धुवा आणि उन्हात वाळवा. त्यानंतर  एक बाऊल घ्या आणि त्यात १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, १ टीस्पून लसूण पावडर, १ टीस्पून कांदा पावडर, १/२ टीस्पून पेपरिका, चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. हे सर्व नीट मिसळा आणि वाळलेल्या बदामाची साले घाला. आता ते कुरकुरीत होईपर्यंत ५ ते १० मिनिटे बेक करा, नंतर ते बाहेर काढा आणि डब्यात ठेवा आपण हे स्नॅक्स म्हणून कधीही खाऊ शकतो.

३. फेस मास्क :- बदामाच्या सालींचा वापर करुन देखील आपण त्वचेसाठी फेस मास्क घरच्या घरीच तयार करु शकतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर वेळीच योग्य  उपचार केले नाहीत तर त्वचेच्या अनेक समस्या कायमसाठी सुरू होतात. त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर बदामाच्या सालींची पेस्ट करून ही पेस्ट त्या फेस मास्क मध्ये मिक्स करून घ्यावी. चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील तर बदाम भिजवून ते सालांसकट वाटून लावल्यास अनेक स्किन प्रॉब्लेम्स लगेच दूर होण्यास मदत मिळते. 

४. दातांसाठी :- बदामाची सालं दातांच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाची असतात. दातांच्या अनेक समस्या असतील तर बदामाची सालं जाळून त्यांची राख दातांना रोज लावल्यास,दातांच्या अनेक समस्या कायमसाठी दूर होतील .  

 ५. पोटाच्या तक्रारी होतील दूर :- बदामाच्या तपकिरी सालीमध्ये भरपूर फायबर असते, ते आपल्या आतड्यात गुड बॅक्टेरिया वाढवते आणि त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात. वाळलेल्या बदामाची साले अळशीच्या बिया, खरबूजाच्या बिया या एकत्र करुन त्याची पावडर तयार करुन घ्यावी. ही पावडर गरम दुधात घालून असे दूध प्यायल्याने आपले पोट साफ राहते. यामुळे पोटासंबंधीच्या अनेक समस्या दूर होतात.

Web Title: how to use almond peels and their benefits Don’t throw almond peel, here are some genius ways to reuse them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.