सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्याला स्वतःकडे पहायला वेळ देखील मिळत नाही. या सगळ्या कामात आपले शरीर इतके थकून जाते की स्वतःसाठी वेळच उरत नाही. सततचा हा थकवा आल्यामुळे आपल्या चेहेऱ्यावरचा स्किन ग्लो हळुहळु कमी होऊ लागतो. चेहऱ्यावरचा स्किन ग्लो कमी झाल्यामुळे (How can I use aloe vera to whiten my skin fast) आपली स्किन डल, निस्तेज व रुक्ष दिसू लागते. अशावेळी इतर कामाच्या गडबडीत आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ देखील नसतो. अशा परिस्थितीत घरच्या घरी कोरफडीच्या गराचा वापर करुन आपण आपला हरवलेला ग्लो परत आणू शकतो(How do you use aloe vera for instant glowing skin).
आजकाल बहुतेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये एलोवेरा जेलचा वापर फार मोठ्या प्रमाणांत केला जातो. त्वचेच्या अनेक लहान - सहान समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल हा अत्यंत फायदेशीर ठरतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर वेगवेगळे उपचार शोधण्यापेक्षा कोरफडीचा (How to Use Aloe Vera for Clear Glowing Spotless Skin) एकच उपाय करणं फायदेशीर मानला जातो. रोजच्या घाई गडबडीत जर आपल्याला पार्लरला जायला वेळ नसेल तर आपण घरीच एलोवेरा जेल आणि इतर काही पदार्थांचा वापर करु शकतो. आपल्या स्किनच्या प्रत्येक समस्यांनुसार एलोवेरा जेलमध्ये काही पदार्थ मिसळून याचा आपण स्किनसाठी वापर करु शकतो. स्किनच्या कोणत्या समस्यांनुसार एलोवेरा जेलमध्ये नेमके काय मिसळून फेसमास्क तयार करायचा ते पाहूयात(How to use aloe vera for best skin results).
स्किनच्या अनेक समस्यांवर एलोवेरा जेलचा उपाय...
१. त्वचा खोलवर आतून स्वच्छ करण्यासाठी :- त्वचा खोलवर आतून स्वच्छ करण्यासाठी आपण एलोवेरा जेल आणि दुधाचा वापर करु शकतो. एलोवेरा जेल आणि दूध एकत्रित मिसळून आपण त्याचा फेसपॅक तयार करु शकतो. त्वचेवरील ओपन पोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची धूळ, माती, घाण साचून राहते. त्वचेवरील ही घाण काढून टाकण्यासाठी त्वचा फक्त पाण्याने धुवून चालत नाही. यासाठी त्वचा आतून स्वच्छ करणे गरजेचे असते. त्वचा खोलवर आतून स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि दूध एकत्रित मिक्स करुन घ्यावे. हा फेसपॅक त्वचेला लावून घ्यावा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत मिळते.
२. पिगमेंटेशन दूर करण्यासाठी :- पिगमेंटेशनची समस्या निर्माण झाल्यास त्वचेचा टोन्ड खराब होण्यास सुरूवात होते. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन घालवण्यासाठी एक टेबलस्पून एलोवेरा जेल घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करावी. एलोवेरा जेल आणि हळदीचा फेसमास्क त्वचेवर लावल्याने त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशनची समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचेवर काळे डाग पडले तर अशी काळवंडलेली त्वचा कोणालाच नको असते. त्वचेवरील हायपर पिग्मेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि हळद मिक्स करुन त्याचा मास्क तयार करु शकता.
जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर..
३. टॅनिंग काढण्यासाठी :- कडक ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेसंबधीत अनेक समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. स्किन टॅनिंगच्या समस्येमुळे आपली त्वचा कायम काळवंडलेली दिसते. अशा स्थितीत टॅनिंग काढण्यासाठी आपण एलोवेरा जेल आणि तांदुळाचे पाणी मिक्स करुन त्याचा मास्क तयार करु शकता. एलोवेरा जेल आणि तांदुळाच्या पाण्याचा वापर करुन आपण त्वचेचे टॅनिंग काढू शकता.
केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...
४. स्किन व्हाईटनिंग :- चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आपण एलोवेरा जेल मध्ये कॉफी पावडर मिक्स करुन त्याचा फेसपॅक तयार करु शकतो. त्वचेसाठी एलोवेरा जेल आणि कॉफी पावडरचा वापर केल्यास स्किन व्हाईटनिंग होण्यास मदत मिळते. कॉफी पावडरमुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येईलच पण तुम्हाला फ्रेश देखील वाटेल.