ॲलोवेरा जेल हे निसर्गाकडून मिळालेले एक असे औषध आहे जे केवळ आपले आरोग्य राखण्यासाठीचेच काम करत नाही तर आपले सौंदर्य वाढवण्यास देखील उपयुक्त आहे. बहुतेक लोक कोरफडीचा वापर चेहरा आणि केसांवर करतात, जेणेकरून त्यांना नैसर्गिक चमक मिळेल. (How To Use Aloe Vera For Skin Whitening) फेस पॅक असो, हेअर पॅक असो किंवा नाईट क्रीम असो. एलोवेरा जेल प्रत्येक प्रकारे वापरता येते. (Can we use soap after applying aloe vera gel on the face)
एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा साबणाने धुवावा की नाही असा प्रश्न पडतो. चेहरा धुतल्यानं ॲलोवेराचा प्रभाव कमी होऊ शकतो असं तुम्हालाही वाटत असेल तर. ॲलोवेरा जेलचा प्रभाव त्वचेवर योग्यरित्या दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Can we use soap after applying aloe vera gel on the face)
आपण चेहरा का धुतो?
चेहरा स्वच्छ करण्यासाठी, त्यावर साचलेली घाण काढण्यासाठी किंवा ताजेतवाने वाटण्यासाठी आपण चेहरा धुतो. या तिन्ही गोष्टी ॲलोवेरा जेलच्या मदतीनेही करता येतात. ॲलोवेरा जेल हे स्वतःच एक क्लिन्झर आहे जे तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग परत आणते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड लावल्यानंतर साबणाने चेहरा धुण्याची चूक करत असाल तर आजपासूनच ही चूक सुधारा.
कारण असे केल्याने चेहऱ्याचे पीएच संतुलन बिघडू शकते. त्यामुळे, तुम्ही ॲलोवेराचा वापर फेस पॅक म्हणून किंवा मास्क म्हणून करु शकता. कोणत्याही स्थितीत तुमचा चेहरा साबणाने धुणं टाळा. हे जेल लावल्यानंतर चेहरा धुतल्यास त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम समोर येऊ शकतात.
ॲलोवेराचे त्वचेला होणारे फायदे
ॲलोवेरा चेहऱ्यावर लावण्याचे अगणित फायदे आहेत. त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होते. कोरफड हा अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक ॲलोवेराचा अधिक वापर करतात.
रक्त वाढेल, हाडंही कायम चांगली राहतील; रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी 'हा' पदार्थ खा
हे जेल फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी, चेहरा खोलवर स्वच्छ करण्यासाठी, मुरुमांची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. एलोवेरा लावल्याने चेहऱ्याच्या त्वचेला घट्टपणा येतो. ज्याच्या मदतीने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात आणि तुमचा चेहरा नेहमीच तरुण आणि सुंदर दिसू शकतो. कोरफडीचा वापर नाईट क्रीम म्हणून देखील केला जाऊ शकतो. ते डाग, टॅनिंग, पिगमेंटेशन दूर करण्यास आणि चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत करते.
ॲलोवेरा त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड लावता तेव्हा ते ओलावा राहतो आणि त्वचा हायड्रेट राहते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांना कोरफडीचा वापर करून मुलायम आणि गुळगुळीत त्वचा मिळू शकते.