पावसाळ्यात त्वचा (Aloe Vera) निस्तेज दिसू लागते आणि कोरडेपणा जाणवतो. काही घरगुती उपाय चेहऱ्याचं हरवलेलं सौंदर्यं परत आणू शकतात. चेहरा कोरडा दिसला की चेहऱ्यावर काळेपणा येतो. (Aloe Vera For Skin Whitening) एलोवेरा त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामळे चेहऱ्यावर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होते आणि त्वचेचं मॉईश्चर टिकून राहतं. (How to use aloe vera for skin whitening)
एलोवेरा आणि मध
जेव्हा तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटत असेल तेव्हाएलोवेरा आणि मध एकत्र करून त्यावर लावा. 2 चमचे ताज्या एलोवेराचा पल्प किंवा एलोवेरा जेल घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. या मिश्रणात पिकलेली केळीही घालता येते. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा.
एलोवेरा आणि गुलाबजल
नितळ त्वचेसाठी आणि त्वचेवर निखार येण्यासाठी एलोवेराचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. एक चमचा एलोवेरामध्ये एक चमचा गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. या उपायानं चेहरा फेश दिसेल.
एलोवेरा आणि लिंबू
लिंबू आणि एलोवेरा चेहऱ्यावर एंटी ऑक्सिडेंट्स मास्कप्रमाणे काम करतो. हा एक नैसर्गिक मास्क असून एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट १५ मिनिटं चेहऱ्याला लावून नंतर चेहरा धुवा. या उपायानं चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल.
एलोवेरा आणि ब्राऊन शुगर
एलोवेरा फेस पॅकच नाही तर फेस स्क्रब देखील यापासून बनवता येते. हा फेस स्क्रब बनवण्यासाठी एलोवेरामध्ये ब्राऊन शुगर मिसळा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर चोळून धुवा. हे स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यात प्रभावी ठरते.
एलोवेरा आणि हळद
एलोवेरा आणि हळद मिसळून याचा पॅक तयार करा. 20मिनिटे चेहरा, गळा आणि मान यांवर लावल्यानंतर धुवा. यामुळे चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसेल. एक चमचा एलोवेरामध्ये एक चमचा मध, चिमूटभर हळद आणि गुलाबजलाचे काही थेंब घाला. चेहरा, गळा आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. या उपायानं चेहरा उजळण्यास मदत होईल.