Join us

चेहऱ्यावर सगळीकडेच पिंपल्सच दिसतात ? रात्री तुरटीचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:00 IST

Alum benefits for skin: तुरटीमधील अ‍ॅंटी-सेप्टिक आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेसाठी फायदेशीर असतात.

Alum benefits for skin: दोन दिवस, तीन दिवस उलटून गेले की, पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरतात. पिंपल्समुळं चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच, सोबतच वेदनाही होतात. अशात हे पिंपल्स घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय केले जातात. मात्र, केमिकल्सच्या वापरानं त्वचेचं नुकसानही होतं. तुमचाही चेहरा पिंपल्सनं भरला असेल आणि ते दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय म्हणजे तुरटी.

तुरटीचा वापर त्वचेसाठी खूप आधीपासून केला जातो. तुरटीमधील अ‍ॅंटी-सेप्टिक आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेसाठी फायदेशीर असतात. या गुणांमुळे त्वचेवरील पिंपल्स, अ‍ॅक्ने, इन्फेक्शन दूर होतं. रात्री तुरटी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा साफ होते आणि चमकदार होते. चला जाणून घेऊ रात्री चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे फायदे...

चेहऱ्यावर तुरटी कशी लावाल?

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर तुरटी लावण्यासाठी आधी तुरटीचा एक तुकडा पाण्यात भिजवा. नंतर तुरटी कशावर तरी घासून पेस्ट बनवा. ही पेस्ट थोड्या गुलाब जलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या. 

तुरटी लावण्याचे फायदे

त्वचा आतपर्यंत होते साफ

त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये चिकटून बसलेला मळ-माती साफ करण्यासाठी तुरटी चेहऱ्यावर लावू शकता. रात्री झोपण्याआधी तुरटी चेहऱ्यावर लावल्यास रोमछिद्रांमध्ये जमा मळ-माती निघून जाते. त्यामुळे पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या कमी होते.

ब्लॅकहेड्स कमी होतात

चेहऱ्याच्या तेलकट भागात आणि टी-झोनमध्ये अनेक पिपल्सची समस्या अधिक होते. तसेच या भागात ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सही होतात. या समस्या दूर करण्यासाठी देखील तुम्हाला तुरटीची मदत मिळू शकते. तुरटीमुळे ब्लॅकहेड्स सहज निघून जातात. 

त्वचा उजळते

चेहऱ्याच्या त्वचेमध्ये जमा झालेले डेड स्कीन सेल्स साफ करण्यास तुरटीचा लेप लावू शकता. तुरटीच्या या लेपानं डेड स्कीन निघून जाते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहरा आणखी चमकदार आणि फ्रेश दिसतो.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स