आजकाल बहुतेक प्रत्येकालाच केसांच्या लहान - मोठ्या समस्यांनी सतावले आहे. केसगळतीपासून ते केसांत कोंडा होण्यापर्यंत प्रत्येकीच्या केसांच्या समस्या या फार (How to use Amla Sikakai and Reetha as a hair cleanser) वेगवेगळ्या असतात. केसांच्या या समस्यांवर आपण अनेक उपाय करुन पाहतो. केसांसाठी काहीवेळा वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, तेल, हेअर प्रॉडक्ट्स वापरुन देखील केसांच्या (How To Use Amla Reetha Shikakai Water For Hair) समस्या काही केल्या कमीच होत नाहीत, अशावेळी केसांसाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हटल्यावर सगळ्यांत आधी शिकेकाई, आवळा, रिठा यांसारख्या औषधी वनस्पती आपल्याला आठवतात(Amla, Reetha & Shikakai for Hair Care).
पूर्वीच्या काळापासून आवळा, रिठा, शिकेकाई या तीन गोष्टी केस धुण्यासाठी शॅम्पूच्या स्वरूपात वापरल्या जात आहेत. आवळा, रिठा आणि शिकेकाई मिसळून केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतात. शिकेकाईमधील औषधी गुणधर्मामुळे मुळांसह संपूर्ण केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केसगळती तसंच केस तुटणे इत्यादी समस्या कमी होतात. शिकेकाईचा नियमित वापर केल्यास केसगळती आणि कमी वयात पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते. आयुर्वेदानुसार शिकेकाईचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी सारखे अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात आणि केस मजबूत करतात. शिकेकाई प्रमाणेच रीठाचा देखील आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केसांना मजबूत करतात, ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळतो. या नैसर्गिक औषधी वनस्पतीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे घटक आपल्या केसांचे संरक्षण करण्याचे काम करतात आणि नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझ देखील करतात. आवळा, रिठा, शिकेकाई या नैसर्गिक घटकांचा वापर करुन केसांची स्वच्छता कशी ठेवू शकतो ते पाहूयात.
केसांसाठी आवळा, रिठा, शिकेकाईच्या पाण्याचा वापर कसा करायचा ?
साहित्य :-
१. रिठा - १०० ग्रॅम २. शिकेकाई - २० ग्रॅम ३. सुकवलेला आवळा - २० ग्रॅम
आयब्रोज खूपच पातळ आहेत? महाग ब्यूटी ट्रिटमेंट्स नको तर करा ७ उपाय, भुवया दिसतील दाट...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात रिठा, शिकेकाई, सुकवलेला आवळा घेऊन हे सगळे घटक पाण्यांत भिजत ठेवावेत. २. ६ ते ८ तास हे सगळे घटक पाण्यांत भिजत ठेवा. आपण संपूर्ण रात्रभर देखील पाण्यांत रिठा, शिकेकाई, सुकवलेला आवळा भिजत घालू शकता. ३. दुसऱ्या दिवशी गॅसच्या मंद आचेवर हे भांड ठेवून या पाण्याला हलकेच उकळी आणावी. ४. त्यानंतर हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. ५. या रिठा, शिकेकाई, आवळायुक्त पाण्याचा वापर आपण केसांसाठी करु शकतो.
किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...
उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...
रिठा, शिकेकाई, आवळायुक्त पाण्याचा वापर आपण केसांसाठी कसा करावा...
या तयार रिठा, शिकेकाई, आवळायुक्त पाण्याचा वापर आपण केसांसाठी करू शकतो. हे तयार पाणी थोडे कोमट होऊ द्यावे. पाणी कोमट झाल्यावर ते थेट केसांवर, स्काल्पवर ओतावे. केसांचे छोट्या छोट्या भागात विभाजन करून आपण हे पाणी केसांना तसेच स्काल्पला लावू शकतो. हे पाणी स्काल्पवर ओतून हलकेच हाताने चोळून मसाज करून घ्यावा. या पाण्याने केस आणि स्काल्पला मसाज केल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी हे पाणी केसांवर तसेच राहू द्यावे. त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. शक्यतो, केसांवर तेल लावले नसेल तेव्हा या पाण्याचा वापर करा, कारण या पाण्याने केसांवरचे तेल संपूर्णपणे धुतले जात नाही. परिणामी केस तसेच चिकट राहतात. यासाठी केसांना तेल लावले नसेल तेव्हाच या पाण्याचा वापर करावा. आठवड्यातून किमान २ वेळा तरी आपण हा उपाय केला तर केसांच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.