सध्याच्या स्थितीत केस गळणं, केस कमकुवत होणं खूपच कॉमन झालंय, कमीत वयातच केस पांढरे होऊ लागतात. केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केस गळतात आणि तुटतात. (Amla For Long Hairs) औषधं घेण्याऐवजी तुम्ही आपल्या आहाराकडे अधिक लक्ष दिलं तर केस गळण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. (How to Get Long Hairs Using Amla) आवळा एक इम्यूनिटी बुस्टर आहे. आवळा खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आवळ्याच्या सेवनाने बरेच प्रोब्लेम्स दूर होण्यास मदत होते. आवळ्याचा आहारात समावेश करून तुम्ही केसांना दाट आणि लांबसडक बनवू शकता. (Amla For Hair Care)
सायन्स डिरेक्ट. कॉमच्या रिपोर्टनुसार आवळा केसांसाठी हेअर टॉनिक प्रमाणे काम करतो. (Ref)या अभ्यासानुसार आवळा खाल्ल्याने केस निरोगी राहण्यास मदत होते. (How To Prepare And Use Amla Juice To Promote Hair Growth) या अभ्यासातून दिसून आले की आवळ्याचे सिरम केस गळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील अॅनादेन आणि टेलोजन केस गळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरते. (Ref)
आवळ्याच्या वापराने केस लांबसडक-दाट कसे होतात?
1) आवळा व्हिटामीन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, आयर्न, व्हिटामीन बी, फायबर्स, कॅरोटीन यांसारखी पोषक तत्व असतात. ही पोषक तत्व केसांसाठी फायदेशीर ठरतात. आवळ्याच्या सेवनाने केस मजबूत आणि दाट राहण्यासही मदत होते. केस दाट काळे होतात.
2) आवळा खाल्ल्ल्याने केसांच्या इतर समस्यांपासूही बचाव होतो. यात आढळणारे कॅरेटिन केसांना पुरेपूर पोषण देते. ज्यामुळे हेअर क्युटिकल्स प्रोडक्शनमध्ये मदत होते आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते. आवळ्यात आयर्नचे प्रमाणह भरपूर असते. जे केसांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते.
केस वाढवण्यासाठी आवळ्याचे या पद्धतीने सेवन करा
आवळा तुमचे केस दाट आणि मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आवळ्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. आवळ्याचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता किंवा याची पावडर बनवून खाऊ शकता किंवा कच्चा आवळा खाऊ शकता. यामुळे केस गळणं कमी होईल आणि केसांचा टेक्स्चर सुधारेल.
कॅल्शियम पाहिजे पण दूध प्यायला नको? ५ पदार्थ खा, हाडांना ताकद-दुप्पट कॅल्शियम मिळेल
नारळाच्या तेलात आवळ्याची पावडर मिसळून एक पॅक तयार करून घ्या. आठवड्यातून एकदा केसांना व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासानंतर केस व्यवस्थित धुवून घ्या. यामुळे केसांना स्मूद कंडिशनिंग मिळेल आणि केस गळणंसुद्धा कमी होईल. आवळा पावडर एलोवेरा जेलमध्ये मिसळून त्याचा पॅक तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावू शकता. दही आणि मध एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात आवळा पावडर घालून पॅक बनवा. आठवड्यातून एकदा केसांना लावाल्याने समस्या दूर होण्यास मदत होईल.