Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झालेत? आठवड्यातून एकदा 'या' पाण्याने केस धुवा; दाट-लांबसडक होतील केस

केस पातळ झालेत? आठवड्यातून एकदा 'या' पाण्याने केस धुवा; दाट-लांबसडक होतील केस

How To Use Amla Water For Long Hairs (Kes Vadhvnyache Upay Sanga) : केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसही मुळांपासून मजबूत होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:13 PM2024-03-19T12:13:47+5:302024-03-19T19:30:50+5:30

How To Use Amla Water For Long Hairs (Kes Vadhvnyache Upay Sanga) : केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसही मुळांपासून मजबूत होतात.

How To Use Amla Water For Long Hairs : Amla For Hair Growth How to Use Amla For Hair Growth | केस पातळ झालेत? आठवड्यातून एकदा 'या' पाण्याने केस धुवा; दाट-लांबसडक होतील केस

केस पातळ झालेत? आठवड्यातून एकदा 'या' पाण्याने केस धुवा; दाट-लांबसडक होतील केस

आपले केस लांबसडक-दाट असावेत अशी प्रत्येकाचीच  इच्छा असते. त्यासाठी काही सोप्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. केसांना लांब-काळे बनवण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या पाण्याचा वापर करू शकता. (How To Use Amla Water For Long Hairs) आवळ्यात व्हिटामीन सी, एटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे केस लांब होण्यास मदत होते. ज्यामुळे सप्लिट एंड्ची समस्या टाळता येते. (Hair Growth Tips) केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसही मुळांपासून मजबूत होतात. केसांसाठी आवळ्याचं पाणी कसं तयार करायचं ते पाहूया. (How to Use Amla For Hairs)

जर्नल ऑफ इथनोफारमाकोलॉजीच्या रिपोर्टनुसार केस गळतीची समस्या असणाऱ्या २५ लोकांवर हा प्रयोग करण्यात आला होता. आवळ्याच्या सेवनाने किंवा आवळ्याची उत्पादनं वापरल्याने केस वाढण्यास मदत होते.  या अभ्यासाच्या परिणामांवरून दिसून आले की आवळ्याचा रस महिलांमध्ये एंड्रोजेनिक केस गळतीवर उपचार करण्यासाठी आणि एनाजेन फेज वाढवण्यास मदत करतो. 

लांब केसांसाठी आवळ्याचे पाणी फायदेशीर

केसांसाठी एखाद्या चांगल्या हेअर वॉशप्रमाणे तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. यासाठी १ चमचा आवळ्याच्या पावडरमध्ये रिठा पावडर मिसळा आणि त्यात जवळपास १०० मिलीटर पाणी मिसळा. रिठा पावडर  न मिसळताही तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता.  हे पाणी केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून ४ ते ५ मिनिटं मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

आवळ्याचं पाणी तयार करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आवळा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून त्यात पाणी घाला आणि उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा पाणी उकळेल व्यवस्थित तेव्हा आचेवरून काढून पाणी थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी थंड झाल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस लांब होण्यासही मदत होते. अर्धा करून आवळ्याचा रस एका पाण्यात भरून केसांना लावू शकता. ज्यामुळे स्काल्पपासून मेंदूपर्यंत अनेकदा फायदे मिळतात.

डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

केसांना आवळा लावण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या?

आवल्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून केसांना लावू सखता. हे मिश्रण केसांवर हेअर टॉनिकप्रमाणे काम करते.   एक तास केसांना लावून ठेवा. आवळ्यात कढीपत्ता मिसळून केसांना लावा. आवळ्याचे हे तुकडे कढीपत्त्यात घालून मिसळून घ्या. ही पेस्ट तयार करण्यासाठी त्यात गरजेनुसार पाणी मिसळा.

आवळ्यात कढीपत्ता मिसळूनही केसांना लावू शकता.  यासाठी आवळा छोट्या तुकड्यांमध्ये चिरा. त्यात कढीपत्ता मिसळा ही पेस्ट बनवण्यासाठी गरजेनुसार पाणी मिसळा काही मिनिटांनी डोक्याला ही पेस्ट लावा नंतर केस धुवून घ्या.

कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल

आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. २ चमचे आवळा पावडरमध्ये मध घालून डोक्याला लावल्याने अनेक फायदे मिळतात. ही पेस्ट केसांना ३० ते ४० मिनिटं लावून ठेवा. आठवड्यातून २ वेळा लावल्यानं चांगला परिणाम  दिसेल.

Web Title: How To Use Amla Water For Long Hairs : Amla For Hair Growth How to Use Amla For Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.