Lokmat Sakhi >Beauty > केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...

केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...

Benefits of Apple Cider Vinegar To Reduc Hair Dandruff : How To Use Apple Cider Vinegar For Dandruff Control : अनेक प्रकारचे तेल, शाम्पू वापरूनही केसांतील कोंडा जात नसेल तर करा एक विशेष उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 03:13 PM2024-09-14T15:13:07+5:302024-09-14T15:17:32+5:30

Benefits of Apple Cider Vinegar To Reduc Hair Dandruff : How To Use Apple Cider Vinegar For Dandruff Control : अनेक प्रकारचे तेल, शाम्पू वापरूनही केसांतील कोंडा जात नसेल तर करा एक विशेष उपाय...

How To Use Apple Cider Vinegar For Dandruff Control Benefits of Apple Cider Vinegar To Reduc Hair Dandruff | केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...

केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...

केसांत कोंडा होणे ही एक कॉमन समस्या आहे. केसांमध्ये झालेल्या कोंड्यामुळे आपला लुक आणि केस दोन्ही खराब होतात. केसांशी संबंधित या समस्येने अनेकजण हैराण असतात. केसांत कोंडा होण्याच्या समस्येने केस आणि स्कॅल्प या दोघांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होते. केसांत कोंडा झाल्यावर स्कॅल्पला खाज येऊन डोक्यातील स्किनचे पातळ पापुद्रे निघू लागतात( Apple Cider Vinegar Help Treat Dandruff).

केसांत कोंडा जास्त झाल्यास चेहरा, डोके, मान आणि पाठीवर मुरुमांची समस्या उद्भवू शकते.  केसांची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्याने, केसांना योग्य पोषण न मिळाल्याने किंवा केसांना तेल न लावल्यामुळे कोंडा होतो. अशा परिस्थितीत आपण या समस्येचा सामना करण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादने देखील वापरतो, परंतु यामुळे केसांचे नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होते. अशा परिस्थितीत कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय देखील करुन पाहू शकतो(How To Use Apple Cider Vinegar For Dandruff Control).

केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर... 

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. यात एंटी - इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे केसांसाठी अतिशय फायदेशीर असतात . याचबरोबर यातील औषधी गुणधर्माच्या मदतीने केसांची वाढ चांगली होते. याचबरोबर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर स्कॅल्पवर केल्यास केसांतील  कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.  

ओपन पोर्स वेळीच करा स्वच्छ ! नाहीतर होतील स्किन प्रॉब्लेम्स, ओपन पोर्स क्लिन करण्याची कोरियन ट्रिक... 

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी करा एक खास उपाय... 

१. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर - २ टेबलस्पून 
२. पाणी - २ टेबलस्पून 
३. कापसाचा बोळा किंवा कॉटन बॉल - ४ ते ५  

मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस  गळतील - होईल नुकसान...

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर कसा करावा ? 

एका मोठ्या बाऊलमध्ये अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घालावे. पाणी आणि अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर यांचे प्रमाण सम असावेत. आता या तयार लिक्विडमध्ये कापसाचा बोळा किंवा कॉटन बॉल व्यवस्थित संपूर्ण भिजेल असा भिजवून घ्यावा. त्यानंतर कॉटन बॉलच्या मदतीने ते लिक्विड स्कॅल्पला ज्या भागात खूप कोंडा आहे त्या भागात लावून घ्यावे. त्यानंतर ३० मिनीटांनी केस शाम्पूने धुवून स्वच्छ करुन घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून किमान ३ दिवस केल्यास केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

दिवसभर कपड्यांवर गळालेले केस पाहून दु:खहोतं? ‘हे’ खास तेल लावा, केस गळणारच नाहीत...

Web Title: How To Use Apple Cider Vinegar For Dandruff Control Benefits of Apple Cider Vinegar To Reduc Hair Dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.