केळ हे एक असं फळं आहे की ज्याच्या सालीचा देखील आपण संपूर्णपणे वापर करु शकतो. आपल्या डाएटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश करतो, केळ हे त्यापैकीच एक फळं आहे. शक्यतो आपण केळ खाऊन त्याची साल फेकून देतो. परंतु केळ्यासोबतच त्याच्या सालीत असणारे भरपूर औषधी गुणधर्म हे आपले आरोग्य, सौंदर्य यांसारख्या अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतात. केळी आणि त्याची सालं दोन्ही आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे देऊ शकतात( how to use banana peels for pedicure)
केळीच्या सालीमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, साखर, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन - ए, कॅल्शियम आणि लोह यासोबतच अनेक पोषक तत्व असतात. केळीच्या सालीचा अनेक प्रकारे वापर केल्याने त्यातील आवश्यक पोषक तत्वे आपल्याला मिळतात आणि त्यांची कमतरता भासत नाही. केळीची साल केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाही तर हात आणि पायांची त्वचा देखील निरोगी ठेवते. केळीची साल पायांच्या त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ होते तसेच त्वचेतील घाण, धूळ, माती काढता येते. आपण पायांच्या स्वच्छतेसाठी महागड्या पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअरसाठी हजारो रुपये खर्च करतो. परंतु याउलट आपण पेडिक्युअर करण्यासाठी केळीची साल (If the feet look dirty, then try banana peel in this way, pedicure will be done at home) देखील वापरू शकतो. केळीच्या सालीने पेडिक्युअर केल्याने त्वचा मऊ आणि स्वच्छ होते. पाय स्वच्छ ठेवण्यासाठी केळीच्या साली लावण्याचे फायदे आणि योग्य पद्धत जाणून घेऊया(banana peel pedicure the secret to soft smooth feet).
केळीच्या सालीने नेमके पेडिक्युअर कसे करावे ?
आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया तरुणी दर महिन्याला हाता - पायांचे मॅनिक्युअर व पेडिक्युअर करण्यासाठी अनेक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. काहीवेळा पेडिक्युअर करण्यासाठी आपण ब्युटी पार्लरमध्येही जाते. खूप खर्च न करता पेडिक्युअर करण्याचा एखादा सोपा घरगुती उपाय सापडला तर किती सोपं होईल. जर आपण रोजच्या डाएटमध्ये केळी खात असाल तर आतापासून त्याची साल फेकून देऊ नका, त्याऐवजी त्याने आपल्या पायांचे पेडिक्युअर करा.
मेकअप करायचाय पण मेकअप किट नाही ? फक्त लिपस्टिक, काजळ वापरुन झटकन करा मेकअप, दिसा कातील...
१. सगळ्यांत आधी आपले पाय पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. आता केळीची सालं पायाच्या त्वचेवर व्यवस्थित चोळून घ्यावी. ही ट्रिक रोज फॉलो केल्याने पायावरील मृत त्वचेच्या पेशी आणि घाण निघून जाईल आणि आपले पाय स्वच्छ दिसतील.
२. विशेष करून महिलांना हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने त्रास होतो. केळीची साले टाचांवर चोळून काही वेळ तशीच राहू द्या. नंतर टाच पाण्याने स्वच्छ करा. हे नियमित केल्याने त्याचे फायदे आपल्या त्वचेवर दिसून येतील, टाचेची खराब झालेली त्वचा मऊ होण्यास मदत होईल.
घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...
३. केळीच्या सालीवर थोडासा बेकिंग सोडा घाला आणि त्याने आपल्या पायांच्या टाचा चोळून घ्याव्यात. बेकिंग सोडा क्लिनिंग एजंट म्हणून काम करतो. याने आपले पाय चांगले घासून ५ मिनिटे तसेच ते मिश्रण पायांवर राहू द्यावेत. आता अर्धी बादली पाण्यात थोडासा बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा. त्यात पाय बुडवून १० ते १५ मिनिटे बसा. त्यानंतर टॉवेलने पाय पुसून घ्यावेत आणि क्रीम किंवा मॉइश्चरायझर पायांना लावून मसाज करावा.
कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...
४. केळीची साल, दही, मध मिक्सरमध्ये घालून त्याची पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट पाय आणि घोट्यावर लावा आणि ते सुकेपर्यंत तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. तळवे आणि त्वचेला कोरडे होण्यापासून बचाव करण्यासाठी थोडे तेल किंवा मॉइश्चरायझर लावून मसाज करावा.
अशाप्रकारे आपण केळ्याच्या सालींचा वापर करून झटपट घरच्या घरी पेडिक्युअर करु शकतो.