Join us  

केळीच्या सालीचा करा फेसपॅक ! पिंपल्स, काळे डाग आणि डार्क सर्कल्स घालविण्याचा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 7:52 PM

Banana Peel Face Mask Help the Health of Your Skin : केळी आरोग्यासाठी केवढी उपयुक्त आहे, हे तर आपण जाणतोच. पण केळीची सालंही केळी एवढीच बहुगुणी आहेत. त्यामुळेच तर केळी खा आणि केळीची सालं सौंदर्य खुलविण्यासाठी वापरा.

बाजारांतून फळ विकत आणताना आपण सगळ्या फळांसोबतच केळी देखील आवर्जून विकत आणतोच. केळीमध्ये एवढी पोषक तत्व असतात की दररोज एक केळ नियमितपणे खाल्लं तर नक्कीच आरोग्य चांगलं राहतं आणि प्रतिकारशक्ती वाढत जाते. पचनाच्या अनेक समस्या दुर करण्याचं सामर्थ्य केळीमध्ये आहे. एकदा पचनक्रिया सुधारली की आपोआपच इतरही अनेक आजार दूर पळतात. केळ जेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे, तेवढीच चांगली त्याची सालं आहेत. चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स दूर करून त्वचा चमकविण्याचं गुपित केळीच्या सालांमध्ये दडलेलं आहे. 

केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, राइबोफ्लेविन यासोबतच व्हिटॅमिन बी ६ यांसारखी अनेक जीवनसत्त्वे असतात. हेच सगळे गुणधर्म केळीच्या सालींमध्येही असतात. त्यामुळे केळं जितक पौष्टिक आहे तितकच त्याच्या सालीमध्ये देखील पोषक तत्व आढळतात. केळं खाऊन आपण केळीची साल फेकून देतो परंतु हीच साल आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी कामी येते. केळीची सालं व केळ वापरून त्यांचा एकत्रित फेसपॅक बनवून आपल्या चेहऱ्यावर हा फेसपॅक लावल्यास आठवड्याभरातच आपल्या त्वचेवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. केळ्यांच्या सालींचा वापर करून हा फेसपॅक नेमका कसा बनवायचा ते पाहूयात(How to use banana peels to treat pigmentation and acne marks).

हा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. केळ्याची साल - एका केळ्याची साल २. मध - १ टेबलस्पून ३. दही - १ टेबलस्पून ४. केळ्याचे काप - २ केळ्यांचे काप 

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

फेसपॅक बनवण्याची कृती :- 

१. हा फेसपॅक बनवण्यासाठी केळ्याच्या सालींचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. २. आता या साली एका बाऊलमध्ये घेऊन त्यात मध, दही व केळ्यांचे बारीक केलेले काप घालावेत. ३. हे सगळे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन, मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट वाटून घ्यावी. ४. ही बारीक पेस्ट वाटून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून काढून एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. 

पिंपल्स, फोडांचे डाग जाता जात नाहीत? हा घ्या ‘खास’ पाण्याचा सोपा फॉर्म्युला, चेहरा दिसेल नितळ...

केळ्याचा व केळ्यांच्या सालीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार आहे. केळ्याचा सालींचा फेसपॅक तयार करण्याची ही एक पद्धत झाली. याशिवाय आपण हा फेसपॅक तयार न करता केळ्याची साल सोलून ती साल  बाजूने चेहऱ्यावर हलक्या हातानी घासून मसाज करु शकतो. यासाठी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ही केल्याची साल चेहऱ्यावर लावून मसाज करावा व १५ मिनिटे चेहरा सुकू द्यावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

फेसपॅक लावण्याची कृती :- 

१. फेसपॅक लावण्याआधी चेहरा व मान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. २. चेहरा व मान सुती कापडाने पुसून कोरडे करून घ्यावे. ३. यानंतर हा फेसपॅक चेहरा व मानेला लावून बोटांनी मसाज करून घ्यावा. ४. १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने हा फेसपॅक व्यवस्थित धुवून घ्यावा. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स