आयुर्वेदात बेसन सौंदर्य वाढवण्यासाठी परिणामकारक मानला जातो. बेसनाचे उटणं बनवून ते रगडून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची पूर्ण घाण निघून जाते. (Skin Care Tips) चेहऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकण्यासाठी डिप क्लिनिंगची आवश्यकता असते. आठवाड्यातून १ ते २ वेळा बेसनाचा वापर तुम्ही करू शकता. (Tanning Removal Tips) बेसनामुळे फक्त रंग क्लिअर होत नाही तर मानेचा काळेपणा दूर होण्यासही मदत होते. महिलांच्या नाकावर हनुवटीजवळ ब्लॅकहेड्स असतात. अशावेळी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. बेसनाचे फेस स्क्रब लावल्याने चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो. (How To Use Besan And Dahi Remove Blackness)
बेसनाने काळी मान स्वच्छ कशी कराल?
बेसनात अनेक गुण असतात ज्यामुळे स्किन क्लिन होण्यास मदत होते. चेहऱ्यावर बेसन लावल्याने ग्लो येतो आणि स्किनचा काळेपणा दूर होतो. बेसनात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या मानेला लावून रगडून घ्या. थोडावेळ मसाज केल्यानंतर मान पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी २ वेळा करा.
सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!
ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी बेसन
चेहऱ्यावर जमा झालेले ब्लॅक हेड्स काढून टाकण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन आणि १ चमचा दही मिक्स करून घ्या. ही पेस्ट नाकावरचे ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. बेसन आणि दही स्किनसाठी स्क्रबप्रमाणे काम करते.
कॅल्शियम हवयं पण दूध नको? दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट
५ ते ७ मिनिटं स्क्रबिंग केल्यानंतर कापूस आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर करा. ब्लॅकहेड्स आपोआप कमी होतील. बेसन आणि दही मिसळून चेहऱ्याला लावा. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.
डार्क कॉम्प्लेक्शनपासून त्रस्त असाल तर चेहऱ्याला बेसन लावू शकता. बेसन आणि दही मिसळून लावू शकता. याव्यतिरिक्त बेसन आणि दूध मिसळून लावू शकता. बेसनात लिंबू आणि मध मिसळून तुम्ही स्किनवर लावू शकता. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर बेसन लावल्याने डिप क्लिनिंग होईल.