डोळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. पण कधी कधी त्याच्या खाली असणारी काळी वर्तुळे, पातळ आयब्रो आणि पापण्या यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. (Castor oil for eyebrows) सुंदर आणि आकर्षक डोळे अनेकांना प्रेमात पाडतात. लांब आणि जाड पापण्या, भुवया केवळ डोळ्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. (Natural remedies for thicker eyebrows)
अनेकदा आपण भुवया आणि पापण्या जाड करण्यासाठी काजळ, आयब्रो फिलर आणि आयलॅशेसचा वापर करतो. (Eyebrow growth oils: Beauty tips for fuller eyebrows) महागडे उत्पादने वापरुन देखील आपल्या डोळ्यांचे सौंदर्य काही नीटसे होत नाही.(eyebrow care with oils) केमिकल उत्पादनाचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते ज्यामुळे मुरुमे, पुरळ किंवा रॅशेस येऊ लागतात. जर आपल्याला देखील जाड-दाटसर आयब्रो आणि पापण्या हव्या असतील तर एरंडीच्या तेलाचा योग्य प्रकारे वापर केल्यास फायदा होईल. हे तेल कसे वापरायचे जाणून घेऊया. (Coconut oil and castor oil for beauty)
संत्र्याच्या सालीपासून बनवा फेस टोनर, डार्क स्पॉट्स होतील कमी, त्वचा उजळण्यास होईल मदत...
एरंडीच्या तेलाचे फायदे
एरंडीच्या तेलात रिसिनोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक यात आढळतात. जे केसांच्या वाढीस चालना देतात. हे तेल भुवया आणि पापण्यांच्या केसांना अधिक मजबूत बनवतात. तसेच केसांना तुटण्यापासून रोखते. हे तेल केसांना नैसर्गिक चमक देऊन निरोगी ठेवते.
एरंडीच्या तेलाचा वापर कसा कराल?
1. एरंडीचे तेल वापरण्यापूर्वी ते शुद्ध आणि सेंद्रिय एरंडेल तेल वापरत आहात का याची खात्री करा. हे तेल हेक्सेन मुक्त आणि कोल्ड-प्रेस केलेले असायला हवे.
2. तेल वापरण्यापूर्वी आपल्या पापण्या आणि भुवया पूर्णपणे स्वच्छ करा. मेकअप रिमूव्हर वापरुन मेकअप किंवा घाण काढून टाका. यामुळे तेल चांगले शोषले जाईल.
तेल कसे वापराल?
1. स्वच्छ मस्करा ब्रश किंवा कापसाचा गोळा घ्या. हे एरंडीच्या तेलात भिजवून घ्या.
2. जास्तीचे तेल काढून टाका. आता हळूहळू हा ब्रश पापण्या आणि भुवयांवर लावा.
3. पापण्यांवर लावताना तेल डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या.
4. तेल लावल्यानंतर हलक्या हातांनी २ ते ३ मिनिटे मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि तेल चांगले शोषले जाईल.
5. एरंडीचे तेल रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठून कोमट पाण्याने धुवा. नियमितपणे एरंडीच्या तेलाचा वापर केल्याने फायदा होईल.
6. आठवड्यातून ४ ते ५ वेळा लावल्याने काही आठवड्यात फरक जाणवेल.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा लाल-रॅशेस- पुरळ येतात, सतत खाज सुटते? ५ घरगुती उपाय, त्रास होईल कमी
या गोष्टी लक्षात ठेवा
1. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर तेल लावताना काळजी घ्या.
2. एरंडीचे तेल वापरण्यापूर्वी नारळाच्या तेलात मिक्स करुन लावा.
3. जर तेल डोळ्यात गेले तर थंड पाण्याने लगेच चेहरा धुवा.