केसांसाठी तेल हे बेस्ट मानले जाते. आजकाल केस गळती हे कॉमन झालं आहे (Hair care Tips). यावर उपाय म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण तरीही केसांच्या समस्या सुटतीलच असे नाही (Hair Fall). केस जर वारंवार गळत असतील तर, एरंडेल तेलाचा वापर करून पाहा. एरंडेल तेलाचा वापर केल्याने केसांच्या बऱ्याच समस्या सुटतात.
एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण असतात. यामुळे टाळूवर झालेले इन्फेक्शन यासह केस गळतीही थांबते. या तेलामध्ये रिकिनोलेइक अॅसिड असते. ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होते. जर आपणही केस गळतीने त्रस्त असाल तर, एरंडेल तेल आणि खोबरेल तेलाचा वापर करून पाहा. यामुळे केस दाट आणि सुंदर दिसतील(How to Use Castor Oil for Hair (Grow Beautiful Hair Fast)).
केस गळतीची समस्या रोखण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?
- केसांसाठी एरंडेल तेलाचा वापर थेट करू नका. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा एरंडेल तेल घ्या. त्यात २ चमचे खोबरेल तेल घाला. आणि मिक्स करा.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ झाली? ३ गोष्टी करून पाहा; वाढेल ताकद - पन्नाशीतही राहाल फिट
- दुसरीकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तेलाचा बाऊल ठेवा. आणि तेल गरम करा. तेल हलके कोमट गरम झाल्यानंतर गॅस बंद करा.
फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक - चवही बिघडली? शेफ म्हणतात १ ट्रिक वापरुन पाहा; मिनिटात ब्रेड फ्रेश
- आता केस विंचरून घ्या. एका लाकडी कंगव्यावर तेल घ्या आणि सकाल्पपर्यंत तेल केसांना लावा. आपण सकाल्प मसाजही करू शकता.
- २ तासानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. या ट्रिकमुळे केसांची नक्कीच वाढ होईल.