Join us

स्वच्छ-शुभ्र दातांसाठी करा ‘हा’ स्वस्त नॅचरल उपाय, दात चमकतील मोत्यासारखे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:47 IST

Natural Ways To Clean Teeth : तुम्हालाही दात चमकदार हवे असतील आणि त्यांवरील पिवळेपणा घालवायचा असेल तर कोळशापासून तयार दंतमंजनाचा वापर करू शकता. 

Natural Ways To Clean Teeth : दातांचा पिवळेपणा ही अनेकांना होणारी एक चिंताजनक समस्या आहे. कारण सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचे दात पांढरे आणि चमकदार असावेत. चमकदार दातांमुळे चारचौघात तुमचा आत्मविश्वासही वाढतो. अशात लोक दात चमकदार करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. बरेच लोक केमिकल्सचा वापर करतात. ज्यामुळे दात चमकदार तर होतातच, पण दातांसंबंधी इतर समस्यांचा धोकाही वाढतो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण आजही ग्रामीण भागात लोक कोळशानं दात स्वच्छ करतात. कोळसा दात स्वच्छ करण्यासाठी एक बेस्ट पर्याय मानला जातो. पूर्वी लोक दात स्वच्छ करण्यासाठी कोळसाच वापरत होते. तुम्हालाही दात चमकदार हवे असतील आणि त्यांवरील पिवळेपणा घालवायचा असेल तर कोळशापासून तयार दंतमंजनाचा वापर करू शकता. 

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दातांची स्वच्छता न करणे, स्मोकिंग या कारणांमुळे दात पिवळे होतात आणि दातांच्या वेगवेगळ्या समस्या होतात. कमी वयातच दात खराब होऊ लागतात. जर २० ते ३० वर्षांआधीचा विचार कराल तर म्हाताऱ्या लोकांचे दातही चमकदार आणि मजबूत राहत होते. 

आधी कोळसाच वापरला जात होता

पूर्वी बाजारात दात स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे पेस्ट किंवा केमिकल्स नव्हते. तेव्हा लोक कोळसा आणि कडूलिंबाच्या फांदीनं दात स्वच्छ करत होते. पण नंतर या गोष्टींचा वापर कमी होत गेला. मात्र, कोळशानं दात स्वच्छ करण्याचे अनेक फायदेही आहेत. कोळशानं दात स्वच्छ केल्यास पिवळेपणा तर दूर होतोच, सोबतच दातांना कीडही लागत नाही. हेच कारण आहे की, ४० वर्षाआधी लोकांना दातांसंबंधी समस्याही होत नव्हत्या.

दात स्वच्छ करण्याच्या दोन पद्धती

कोळशानं दात स्वच्छ करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यासाठी कोळशाचा एक छोटा तुकडा घ्या आणि दातांवर घासा. नंतर पाण्यानं गुरळा करा. दुसरी पद्धत म्हणजे कोळशाचं पावडर करा आणि त्यानं दात स्वच्छ करा. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या अनेक गावांमध्ये आजही लोक कोळशानं दात स्वच्छ करतात. ग्रामीण भागात राहणारे अनेक लोक याला आजही बेस्ट पर्याय मानतात. त्यांचं मत आहे की, कोळशानं दात आणि हिरड्यांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स