Lokmat Sakhi >Beauty > केसांना हात लावला तरी मोठा गुंता हातात येतो? 'या' दुधाचा केसांसाठी 'असा' करा वापर

केसांना हात लावला तरी मोठा गुंता हातात येतो? 'या' दुधाचा केसांसाठी 'असा' करा वापर

How to Use Coconut Milk in Your Hair : केस पातळ दिसतात, फार गळत असतील तर, 'या' दुधाने केस धुवून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 05:24 PM2024-06-21T17:24:59+5:302024-06-21T17:31:30+5:30

How to Use Coconut Milk in Your Hair : केस पातळ दिसतात, फार गळत असतील तर, 'या' दुधाने केस धुवून पाहा..

How to Use Coconut Milk in Your Hair | केसांना हात लावला तरी मोठा गुंता हातात येतो? 'या' दुधाचा केसांसाठी 'असा' करा वापर

केसांना हात लावला तरी मोठा गुंता हातात येतो? 'या' दुधाचा केसांसाठी 'असा' करा वापर

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण याचे अनेक फायदे आहेत (Coconut Milk). मुख्य म्हणजे नारळाचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करतो. खोबऱ्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो (Hair care Tips). वाटण असो किंवा वडी, पदार्थामध्ये खोबरं घालताच, पदार्थाची चव वाढते (Hair growth). शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. खोबऱ्याच्या दुधाचा वापर आपण पदार्थात करतो.

पण आपण कधी नारळाच्या दुधाचा वापर केसांसाठी करून पाहिलं आहे का? नारळाचे दूध केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी, डी आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. शिवाय केसांच्या मुळांना पोषणही देतात(How to Use Coconut Milk in Your Hair).

केसांसाठी नारळाच्या दुधाचे फायदे

दुधामध्ये असलेले नैसर्गिक फॅट्स केसांना नैसर्गिकरित्या कंडीशन करण्याचे काम करतात. यामुळे केस मऊ, चमकदार आणि कोरडेपणा दूर होतो.

केस गळणे कमी होते

दुधामध्ये असलेले बायोटिन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. याशिवाय, ते टाळूचे आरोग्य देखील सुधारते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.

ऐन तिशीत चेहऱ्यावर सुरकुत्या? रात्री झोपण्यापूर्वी करा ५ गोष्टी, चेहऱ्यावर तेज येईल लखलखीत

केस जाड दिसतात

नारळाचे दूध केसांना पोषण देते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते, शिवाय जाडही दिसतात. आपण नारळाच्या दुधाने केस धुवून शकता. यामुळे केसांची योग्य वाढ होईल.

कोंडा होतो दूर

नारळाच्या दुधात लॅक्टिक अॅसिड आढळते. जे स्काल्पवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. यामुळे कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.

'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

'या' गोष्टी लक्षात ठेवा

नारळाच्या दुधाने केस धुतल्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा. केस नीट न धुतल्यास केसांना दुर्गंधी येऊ शकते. जर आपल्याला नारळाच्या दुधाची ॲलर्जी असेल तर, केसांवर याचा वापर करा. 

Web Title: How to Use Coconut Milk in Your Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.