आजकाल बऱ्याच लोकांचे केस कमी वयात पांढरे (Grey Hairs) होऊ लागले आहेत. फक्त पांढऱ्या केसांची समस्या नसून, अनेक जण केसात कोंडा, पांढरे केस आणि केसांच्या गळतीमुळे त्रस्त आहेत. पण कमी वयात केस पांढरे होण्यामागचं कारण काय? याचा आपण कधी विचार केला आहे का? बिघडलेली जीवनशैली, केसांची निगा न राखणं यासह केमिकल प्रॉडक्ट्समुळे केसांची समस्या आणखीन वाढत जाते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन नामक पिगमेण्टमुळे असतो. हे पिगमेण्ट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिनला तयार होण्यास अडचण निर्माण होते, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात (Hair Care Tips). मग यावर उपाय काय? केस काळे करण्यासाठी आपण हेअर डाय किंवा मेहेंदीचा वापर करतोच. पण नैसर्गिकरित्या केसांना काळे करायचं असेल तर, काही हेअर ऑईलची मदत घ्या. कोणत्या तेलाचा वापर केल्याने केस काळे होतात. पाहा(How to use Coconut oil and Bhringraj powder for white hair).
खोबरेल तेल आणि भृंगराज पावडर(How to use Coconut oil and Bringraj Oil for White Hairs)
आपल्या केसांसाठी खोबरेल तेल म्हणजे वरदान. केसांची निगा राखण्यासाठी भारतीय लोकं खोबरेल तेलाचा वापर करतात. यातील गुणधर्म केसांच्या अनेक समस्या सोडवतात. खोबरेल तेल अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध आहे. याच्या वापरामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. खोबरेल तेलातील गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात भृंगराजची पावडर मिक्स करू शकता.
अर्धा बटाटा किसून त्यात मिसळा २ पिवळ्या गोष्टी, न्यू इयर पार्टीत चेहरा चमकेल
भृंगराजमधील गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यात व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, स्टिरॉइड्स, पॉलीपेप्टाइड्स आणि प्रथिने असतात. केसांची वाढ तर होतेच, शिवाय पांढरे केस, केस गळणे, केसात कोंडा यासमास्यांपासूनही सुटका मिळते.
विशीतच केस पांढरे होऊ लागलेत? खोबरेल तेलात मिसळा एक जादुई गोष्ट, केस होतील सुपर डार्क
केसांवर खोबरेल तेल आणि भृंगराज पावडरचा वापर कसा करावा?
केसांवर खोबरेल तेल आणि भृंगराज पावडरचा वापर करण्यासाठी एका बाऊलमध्ये केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात ४ चमचे भृंगराज पावडर मिक्स करा. बाऊल मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल कोमट झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार तेल केसांच्या मुळासकट लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता.