Join us  

विशीतच केस पांढरे होऊ लागलेत? खोबरेल तेलात मिसळा एक जादुई गोष्ट, केस होतील सुपर डार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 3:28 PM

How To Use Coconut Oil And Lemon Juice For Gray Hair : केसांवर आपण खोबरेल तेल लावतोच, फक्त लावताना एक गोष्ट मिसळून लावा, बघा काही दिवसात दिसेल फरक..

सध्या अनेकांचे विशीनंतरचं केस पांढरे होऊ लागले आहेत. कमी वयात पांढरे होणारे केस आपला कॉण्फिडेन्स लो करतात. पांढरे केस होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या निगडीत समस्या वाढत जातात. पांढरे केस झाल्यानंतर आपण हेअर डाय किंवा मेहेंदी लावून कलर करतो. पण केमिकल प्रॉडक्ट्समुळे केस आणखी खराब होतात.

मुख्य म्हणजे केस आणखी ड्राय रुक्ष दिसतात. केस कमी वयात पांढरे होत असतील तर, त्यावर केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी खोबरेल तेलाचा वापर करून केस काळे करा (Coconut oil). खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात (Hair care Tips). ज्याचा थेट फायदा केस आणि त्वचेला होतो. पण याचा वापर पांढऱ्या केसांवर कसा करावा? पाहूयात(How To Use Coconut Oil And Lemon Juice For Gray Hair).

चमचाभर कॉफीची जादू, कॉफीत मिसळा एक पिवळी गोष्ट, चेहरा चमकेल हिऱ्यासारखा

केसांवर खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचा वापर

खोबरेल तेल हे केसांसाठी महत्त्वाचे औषध मानले जाते. खोबरेल तेल एक उत्तम कंडिशनर आहे, जे केसांना आवश्यक असणारे कंडिशनिंग देते. पण पांढऱ्या केसांवर खोबरेल तेलाचा वापर कसा करावा हे आपल्याला ठाऊक आहे का? खोबरेल तेलात आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसातील गुणधर्म टाळू स्वच्छ करण्यास मदत करतात. लिंबाच्या रसामुळे स्काल्पचा पीएच संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक अ‍ॅसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि आयर्न असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. शिवाय त्यातील अँटी फंगल प्रॉपर्टीज कोंड्यापासून सुटका मिळवून देते.

वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून..

पांढऱ्या केसांवर खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचा वापर कसा करावा?

जेव्हा शरीरातील मेलेनिनचे उत्पादन कमी होते किंवा थांबते तेव्हा आपले केस पांढरे होऊ लागतात. यावर उपाय म्हणून आपण खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी समप्रमाणात आपल्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल आणि लिंबाचा रस घ्या. हे दोन्ही घटक मिक्स करून स्काल्पवर लावून मसाज करा. असे केल्याने स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारेल, शिवाय केसांच्या अनेक समस्या सुटतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स