भारतामध्ये केस आणि त्वचेसाठी खोबरेल तेलाचा (Coconut Oil) वापर होतोच. खोबरेल तेलाच्या वापरामुळे केस आणि त्वचेच्या अनेक समस्या सुटतात. स्काल्पवर सुटलेली खाज असो, किंवा ड्राय झालेली स्किन. प्रत्येक उपायावर आपण खोबरेल तेलाचा वापर करून पाहतो. खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्स आढळतात. पण अनेकदा जास्त खोबरेल तेलाचा वापर केल्याने केस गळती किंवा केसात कोंड्याची समस्या निर्माण होते. शिवाय फक्त खोबरेल तेल केस किंवा त्वचेसाठी फायदेशीर ठरत नाही (Hair care tips).
जर खोबरेल तेलातील गुणधर्मात आणखी वाढ करायची असेल तर, त्यात कापूर मिक्स करा (Skin Care Tips). कापुरामध्ये अँटी-फंगल तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. ज्याचा फायदा केस आणि त्वचेला होतो(How To Use Coconut Oil For Face and Hair).
खोबरेल तेलात मिसळा कापूर आणि लवंग
खोबरेल तेलात कापूर आणि लवंग मिक्स करून लावल्याने केस आणि त्वचेला जास्त फायदा होतो. यासाठी एका वाटीत खोबरेल तेल घ्या, त्यात कापूर आणि लवंग घाला. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात चाळणीने गाळून साठवून ठेवा.
एक कच्च्या बटाट्यात मिसळा २ पिवळ्या गोष्टी; डार्क सर्कल होतील गायब-डोळे दिसतील टवटवीत-सुंदर
केसातून कोंडा होईल गायब
खोबरेल तेलात कापूर आणि लवंग मिक्स करून लावल्याने केसांच्या अनेक समस्या सुटतात. केसातील कोंडा कमी करण्यासाठी आपण या तेलाचा वापर करू शकता. या तेलातील गुणधर्मामुळे स्काल्प क्लिन होते. मुख्य म्हणजे कापूर आणि लवंग केसांचे पोर्स स्वच्छ करतात. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. शिवाय केसात पुन्हा कोंडा तयार होत नाही.
चमचाभर तुपात मिसळा एक खास गोष्ट, ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय; लावताच दिसेल जादुई फरक
त्वचेसाठी फायदेशीर
होममेड तेलाचा वापर त्वचेवर केल्याने फक्त मुरुमांचे डाग नसून, स्किनच्या अनेक समस्या सुटतात. शिवाय ड्राय स्किनच्या समस्येपासूनही सुटका होते. सोरायसिस आणि एक्जिमाच्या समस्येवर देखील फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे या तेलामुळे त्वचा डागरहित दिसू लागते.