Join us  

डोक्यावर हात फिरवताच केसांचा झुपका हाती येतो? नारळ तेल या पद्धतीने लावा-केस गळणं थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 8:38 AM

How to Use Coconut Oil for Hair Growth and Thickness : जर तुम्ही गुंता असलेल्या केसांमध्ये तेल लावले तर हेअर फॉल होण्याची शक्यता जास्त असते.

आत्मविश्वास वाढवण्यात केसांची भूमिका महत्वाची असते. काळे, सुंदर केस सौंदर्यात भर पाडतात. प्रदूषण, धूळ-माती यांमुळे केसांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. (kes galtivar upay) फक्त शॅम्पू किंवा कंडिशनर लावून केस चांगले राहत नाहीत तर केसांना योग्य पोषण मिळण्याचीही आवश्यकता असते. (How to Apply Coconut Oil to Hair) केसांसाठी नारळाचे तेल उत्तम मानले जाते. नारळाचे तेल कोमट करून लावल्यास  केस लांबसडक, चमकदार, काळे होण्यास मदत होते. (How to use coconut oil for hair growth)

सगळ्यात आधी केसांच्या लांबीनुसार योग्य प्रमाणात नारळाचं तेल काढून घ्या. तेल मायक्रोव्हेव्ह किंवा गॅसवर ठेवून गरम करून घ्या. हे तेल केसांवर लावण्याआधी खात्री करा की केस पूर्णपणे कोरडे असतील. तेल लावण्याआधी केस व्यवस्थित सोडवून घ्या. जर तुम्ही गुंता असलेल्या केसांमध्ये तेल लावले तर हेअर फॉल होण्याची शक्यता जास्त असते. (How to Use Coconut Oil for Hair Growth and Thickness)

केस विरळ झाले, झाडूसारखे दिसतात? चमचाभर आळशीच्या बीयांचा जादूई उपाय, दाट होतील केस

तेल कोमट करून स्काल्पवर लावा. नंतर बोटांच्या मदतीने केसांवर मसाज करा. तेल व्यवस्थित लावल्यानंतर थोडावेळ तसंच राहूद्या. नंतर हलक्या हाताने स्काल्पवर मसाज करा. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यास केसांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि केसांना योग्य पोषण मिळेल.

मसाज केल्यानंतर उरलेलं तेल  केसांच्या लांबीवर लावा. जर तुमचे केस पातळ असतील तर यामुळे केसांना हायड्रेशन आणि पोषण दोन्ही मिळेल. तेल लावल्यानंतर केस शॉवर कॅप किंवा टॉवेलच्या मदतीनं व्यवस्थित कव्हर करा किंवा स्टिमर असल्यास केसांवर वाफही घेऊ शकता.

केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील

यामुळे केसांचे तेल खाली पडणार नाही केस मॉईश्चराईज राहतील.  ३० मिनिटांसाठी  आराम केल्यानंतर  तेल केसांमध्ये व्यवस्थित शोषलं जाईल याची खात्री करा. रात्री तुम्ही तेल लावून झोपू शकता. यामुळे केसांवर अधिकाधिक चांगाला परिणाम दिसून येईल. सकाळी केस सौम्या शॅम्पूने धुवा. 

नारळाचे तेल आणि कांद्याचा रस

नारळाचे तेल केसांना  लावल्याने पोषण मिळते. केसांच्या वाढीसाठी बरेच फायदे मिळतात. यात जिंक,  सल्फर, फॉलिक एसिड, व्हिटामीन, सी, ई, बी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत होतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्सकेसांची काळजी