सुंदर लांबसडक केस प्रत्येकालाच आवडतात पण सध्याच्या काळात ही इच्छा पूर्ण होणं हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. कारण सध्याची लाईफस्टाईल, खाणंपिणं बदललंय यामुळे केस फार गळतात आणि केसांना टक्कल पडणं, केस पांढरे होणं अशा समस्या जाणवतात. (How to grow hair Quickly) विंचरताना किंवा केस धुताना केस तुटतात हा त्रास प्रत्येक महिलेला होतो. त्यात जर कोणी जास्त ताण-तणाव घेतला तर केस खूपच गळतात. स्ट्रेसमुळे केस गळतात की केस गळण्याचा स्ट्रेस येतोय हेच कळत नाही. (Kes vadhvnyache upay)
लोक अनेक प्रकारच्या हेअर स्टायलिंग टुल्सचा वापर करतात ज्यामुळे केस डॅमेज होतात आणि वेगाने तुटू लागतात. (How to stop hair fall) केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही केसांची किती काळजी घेता हे फार महत्वाचं असतं. तेल लावून केस व्यवस्थित धुतले, वेळच्यावेळी हेड मसाज केली तर केस वाढण्यास मदत होईल. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय पाहूया. (Hair Growth Tips)
केस वाढण्यासाठी काय करावे (What to do for hair growth faster)
1) केसांना तेल आठवणीने लावा, केस रोज धुवू नका, जास्त हेअर स्टायलिंग टुल्सचा वापर करू नका, केस वेळच्यावेळी ट्रिम करत राहा. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.
१० रूपयांच्या कोथिंबीरीने केस होतील दाट-लांब; कंबरेपर्यंत वाढतील केस, या पद्धतीने केसांना लावा
2) केस वाढवण्याचे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ चमचे कौलैंजी आणि ४ ते ५ कढीपत्ते एका पॅनमध्ये घालून व्यवस्थित भाजून घ्या. भाजल्यानंतर मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित पावडर बनवून घ्या आता एका पॅनमध्ये नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घालून किंवा मोहोरीचचं तेल घालून ही पावडर व्यवस्थित मिक्स करा.
३) २४ तासांसाठी हे असेच ठेवून द्या. त्यानंतर तेल एका बरणीत भरून ठेवा. लागेल तसं बरणीतून थोडं थोडं तेल एका वाटीत काढून केसांना लावा. या तेलाने मालिश केल्यास केसांची वाढ चांगली होईल.
झोपताना केस बांधून ठेवता? अंथरूणात पडताना ५ गोष्टी टाळा,अन्यथा केस गळतील-टक्कलही पडेल
4) मसाज केल्यानंतर रात्रभर केसांची वेणी घालून ठेवा नंतर सकाळी शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांची वाढ चांगली होईल.