Join us

रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, ४ समस्यांवर १ उपाय, चेहरा होईल नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2023 18:09 IST

How to Use Coconut Oil on Your Face Overnight रात्री त्वचेवर खोबरेल तेल लावण्याचे आहेत अनेक फायदे.

वर्षानुवर्षांपासून आपण खोबरेल तेलाचा वापर करत आलो आहे. भारतात खोबरेल तेलाचा वापर केस, त्वचा, व विविध पदार्थ बनवण्यासाठी होतो. खोबरेल तेलाचा अधिक वापर आपण केसांसाठी करत आलो आहे. केसांची समस्या सोडवण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते.

नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम व चमकदार बनते. खोबरेल तेलाचा वापर आपण फक्त सौंदर्य उत्पादनांमधून केला असेल, पण याचा वापर कधी आणि कसा करावा याबाबतीत कमी लोकांना माहित असेल. खोबरेल तेल रात्रीच्या वेळी लावल्याने त्वचेला अधिक फायदे मिळतात(How to Use Coconut Oil on Your Face Overnight).

त्वचेमध्ये कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होणे, सुरकुत्या पडणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. नारळाच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेची मजबूती आणि लवचिकता राखण्यासाठी काम करतात. या तेलात व्हिटॅमिन ई आणि ए देखील आढळतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून झोपाल, तर तुमचा चेहरा नेहमी तरूण दिसेल.

डार्क पॅचेस कमी करते

चेहऱ्यावर अनेक कारणांमुळे डार्क पॅचेस पडतात. ज्यामुळे त्वचेचं सौंदर्य बिघडते. यासाठी रात्री चेहरा स्वच्छ धुवा, त्यानंतर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून मसाज करा. व सकाळी उठल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. याने डार्क पॅचेस कमी होतील व चेहरा चमकेल.

चमचाभर मेथीचे दाणे -मूठभर कडीपत्ता! दोनच गोष्टी वापरा, केस होतील घनदाट -चमकदार

चेहऱ्याची सूज होईल कमी

चेहऱ्या अनेक कारणांमुळे सुजते. या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे त्वचेला आतून बरे करण्याचे काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मसाज करा. याने चेहऱ्यावरील सूज कमी होईल.

त्वचा होईल हायड्रेट

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. खोबरेल तेल त्वचेतील मॉइश्चर लॉक करते. ज्याने त्वचा कोरडी होत नाही. यासाठी रोज खोबरेल तेलाने चेहरा मसाज करा.

माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

एक्ने

तेलकट त्वचेवर मुरुमांचे डाग तसेच राहतात. मुरुमांच्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. या तेलामध्ये लॉरिक ऍसिड आढळते, ज्यामुळे मुरुमांच्या डाग कमी होतात. व स्किन क्लियर होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी