Join us  

केसांना नियमित खोबरेल तेल लावूनही केस गळतात-कोरडे झाले? तेलात २ गोष्टी मिसळा, केसांचं पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 3:23 PM

How to Use Coconut Oil on Your Hair, for hair growth : केसांना फक्त खोबरेल तेल लावू नका; त्यात २ गोष्टी मिसळा - केसांची वाढ लवकर होईल

बिघडलेल्या जीवनशैलीचा थेट फटका आपल्या आरोग्य, केस आणि त्वचेवर होतो (Hair Growth). त्यामुळे केसांची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. केसांची काळजी घेताना आपण सर्वजण खोबरेल तेलाचा वापर करतो. केसांना खोबरेल तेल लावल्यास हे तेल केसांना एकच नाही तर अनेक फायदे देते (Hairfall problem). यामुळे केसांना ओलावा मिळतो, केसांचा कोरडेपणा दूर होतो, केसांची योग्य वाढ होण्यास मदत होते.

खोबरेल तेल निरोगी ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे. जे केसांचे योग्य पोषण करते. पण फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही. त्यात एक गोष्ट मिसळून केसांना लावा. केसांची पुन्हा नव्याने वाढ होईल. पण खोबरेल तेलाचा वापर केसांवर कसा करावा? पाहूयात(How to Use Coconut Oil on Your Hair, for hair growth).

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलाचा करा असा वापर

खोबरेल तेल आणि कडीपत्ता

खोबरेल तेल आणि कडीपत्ताच्या वापरामुळे केसांना नवीन जीवन मिळते. यासाठी एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात १० ती १२ कडीपत्त्याची पानं घाला. पानं तडतडली की गॅस बंद करा. तयार तेल २० मिनिटांसाठी बाजूला ठेवा. नंतर स्काल्प आणि केसांना लावून मसाज करा.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारा कोमट पाण्याचा १ सोपा उपाय; पाण्यात चिमुटभर 'ही' गोष्ट मिसळा

आठवड्यातून दोनदा अशाप्रकारे खोबरेल तेल वापरल्याने केसांची वाढ तर सुधारतेच शिवाय केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

खोबरेल तेल, दूध आणि केळी

केसांना आपण खोबरेल तेलाचा मास्क लावू शकता. यामुळे केसांना नवी चमक मिळेल. यासाठी एका बाऊलमध्ये खोबरेल तेलात थोडे दूध आणि मॅश केलेले केळी घालून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांवर तासभर ठेवल्यानंतर डोके धुवून स्वच्छ करा. यामुळे केस खूप मऊ होतील आणि केसांना पूर्ण पोषणही मिळेल. या हेअर मास्कचा वापर आपण १५ दिवसातून एकदा करू शकता. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स