Join us  

रोजच्या केस गळतीने टक्कल पडण्याची भिती? नारळाचं तेल 'या' पद्धतीने केसांना लावा, लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:43 PM

How To Use Coconut Oil With Hair Growth (Kes Vadhavnyasathi kay karayche) : केस धुण्याच्या आधी कंडिशनिंगच्या  स्वरूपात तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.

नारळाच्या तेलाचा वापर पूर्वापार केला जात आहे.  (Coconut Oil For Hairs) स्किन आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी नारळाचं तेल एक उत्तम उपाय आहे. (Hair Growth Tips) नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल, एंटी ऑक्सिडेंट आणि एंटी फंगल गुण असतात.  नारळाच्या तेलात व्हिटामीन ई  असते ज्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होते. नारळाच्या तेलात लवंगाचा वापर केल्याने केसांची वाढ दुप्पटीने होते. ज्यामुळे केस गळण्याच्या समस्या टाळण्यास मदत होते आणि केसही लांबचलांब वाढतात. (Clove With Coconut Oil Benefits For Hairs)

२०१५ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार नारळाच्या तेलाने केसांना मिनरल्स आणि ऑईल मिळते. (Hair Care Tips) ज्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होते आणि स्प्लिट इंड्स कमी होतात. भारतीय नारळांचे तेल लावल्याने केसांमधील प्रोटीन्सची कमतरता दूर होण्यास मदत होते.  (Ref) केस धुण्याच्या आधी कंडिशनिंगच्या  स्वरूपात तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. (How To Use Coconut Oil With Hair Growth)

केसांतील कोंडा कसा कमी करायचा?

केसातील कोंड्याच्या समस्या टाळण्यासाठी स्काल्प आणि केसांमधील घाण कमी होण्यास मदत होते. कोंड्याची समस्या टाळायच्या असतील तर हेअर फॉल, इचिंग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कोंड्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाबरोबर लवंगाचा वापर करा आठवड्यातून २ ते ३ वेळा याचा वापर केल्याने केसांना बरेच फायदे मिळतील.

नारळाचे तेल आणि लवंगाचा वापर करून तुम्ही केसांची वाढ करू शकता. नारळाच्या तेलात लवंग मिसळून केस आणि स्काल्पला व्यवस्थित लावा. असं केल्याने केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होईल.सिल्की, शायनी केसांसाठी नारळाचं तेल आणि लवंग हा उत्तम पर्याय आहे. केस शायनी आणि सिल्की राहण्यासाठी रोज झोपण्याच्या आधी केसांना नारळाचे तेल आणि लवंग मिसळून केसांना लावा. ज्यामुळे काही दिवसांतच फरक दिसून येईल आणि केस लांब, घनदाट दिसतील.

 

स्काल्पचा ड्रायनेस कमी करण्यासााठी नारळाचे तेल लवंग फायदेशीर ठरतं.  नारळाच्या तेलातील मॉईश्चरायजिंग गुण केसांमधील मॉईश्चर टिकवून ठेवतात. स्काल्पचा ड्रायनेस कमी होणयास मदत होते.  नारळाचे तेल आणि लवंगातील गुण केस गळणं कमी करते. आठवड्यातून  २ ते ३ वेळा केसांना हे लावा याच्या वापराने हेअर फॉल नियंत्रणात येईल.

नारळाच्या तेल आणि लवंग मिसळून केसांना लावा. सगळ्यात ते आधी तीन चार चमचे नारळाचे तेल घ्या त्यात लवंगाच्या २ ते ३ तुकडे घालून हलक्या आचेवर गरम करा. गरम केल्यानंतर लवंगाच्या  कळ्या काढून ठेवा. त्या ठंड झाल्यानंतर तेल केस आणि स्काल्पला व्यवस्थित लावा. आठड्यातून २ ते ३ वेळा  या उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी