Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात नारळपाण्याने फेशियल करण्याचे ४ फायदे, त्वचा दिसेल तुकतुकीत-चेहऱ्यावर येईल तेज...

उन्हाळ्यात नारळपाण्याने फेशियल करण्याचे ४ फायदे, त्वचा दिसेल तुकतुकीत-चेहऱ्यावर येईल तेज...

How To Use Coconut Water For Skincare : उन्हाळ्यात नारळपाणी तर आपण पितोच पण नारळपाण्याने कधी फेशियल केलं आहे का? करुन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 07:25 PM2023-03-17T19:25:56+5:302023-03-17T19:37:46+5:30

How To Use Coconut Water For Skincare : उन्हाळ्यात नारळपाणी तर आपण पितोच पण नारळपाण्याने कधी फेशियल केलं आहे का? करुन पाहा..

How To Use Coconut Water For Skincare | उन्हाळ्यात नारळपाण्याने फेशियल करण्याचे ४ फायदे, त्वचा दिसेल तुकतुकीत-चेहऱ्यावर येईल तेज...

उन्हाळ्यात नारळपाण्याने फेशियल करण्याचे ४ फायदे, त्वचा दिसेल तुकतुकीत-चेहऱ्यावर येईल तेज...

वाढत्या उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी आपण अनेक क्रिमस, सनस्क्रीन लोशन्सचा वापर करतो. उन्हाळ्यात घामामुळे आपली स्किन खूपच डल होऊन निस्तेज, रुक्ष दिसू लागते. उन्हापासून आपल्या स्किनचे संरक्षण करण्यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करतो. वाढत्या उष्णतेमुळे  आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या स्किनला देखील हानी पोहोचू शकते. उन्हाच्या तडाख्यापासून स्किनचा बचाव करण्यासाठी खास काळजी घेणे महत्वाचे असते. 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आपण भरपूर पाणी, फळांचे रस, नारळाचे पाणी पितो. उन्हाळ्यात नारळपाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. नारळ पाण्यातील अनेक पोषक घटक, मिनरल्स, व्हिटॅमिन्स हे शरीराप्रमाणेच आपल्या स्किनसाठी देखील फायदेशीर ठरतात. उन्हाळयात दररोज नारळपाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. यासाठी आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. आपण देखील यंदाच्या उन्हाळ्यात नारळ पाण्याचा वापर करुन आपल्या स्किनची देखभाल करु शकता(How To Use Coconut Water For Skincare).

नारळ पाण्याचा उपयोग नक्की कसा करावा ?

१. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करावा :- 

कधी उन्हांतून बाहेरुन फिरुन आल्यावर नारळ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. कापसावर किंवा एका सुती कापडावर थोडेसे नारळ पाणी ओतून त्याने आपला चेहेरा स्वच्छ पुसून घ्यावा. जर आपण नारळ पाण्याने फेशिअल करत असाल तर नारळ पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील धुळ, माती, मेकअपचे कण निघून जातील. नारळपाण्याने चेहरा धुतल्यानंतर, चेहरा टिश्यू पेपर किंवा स्पंजने न पुसता तसाच कोरडा होऊ द्या.

२. टोनरसाठी वापरा नारळपाणी व गुलाबपाणी  :- 

चेहरा स्वच्छ केल्यावर आपला चेहरा टोन करण्यासाठी देखील नारळपाण्याचाच वापर करायचा आहे. यासाठी नारळपाणी व गुलाबपाणी एकत्रित करुन कापसाच्या बोळ्याने ते चेहऱ्यावर लावा. क्लिंझिंग आणि टोनिंगमुळे आपली स्किन मऊ आणि फ्रेश होईल.

३. स्क्रब बनवण्यासाठी वापरा नारळ पाणी :- 

चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यासाठी आणि स्किन खोलवर स्वच्छ होण्यासाठी आपण स्क्रबरमध्येही नारळपाण्याचा वापर करू शकता. यासाठी कॉफी पावडर, नारळपाणी आणि कोरफडीचा गर एकत्रित करुन ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. हे स्क्रब चेहेऱ्यावरुन काढताना बोटांच्या मदतीने सर्क्युलर मोशनमध्येच तो स्क्रब काढावा. पाच मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

४. फेसपॅक भिजवताना नारळपाण्यातच भिजवा :- 

स्किन मसाज झाल्यावर फेशिअलमधील सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे फेसपॅक. या फेशिअलसाठी फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन, एक चमचा मध, चिमुटभर हळद एकत्र मिक्स करुन घ्यावी. फेसपॅक भिजवण्यासाठी नारळपाण्याचा वापर करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर वीस मिनीटे तसाच  ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका.

Web Title: How To Use Coconut Water For Skincare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.