खाण्यापिण्याची चुकीची सवय, व रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circle) निर्माण होतात. डोळे आत जातात, व डार्क सर्कलमुळे संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. स्क्रीन टायमिंग वाढणे, रात्रीच्या वेळेस मोबाईल फोनचा वापर यासह इतर कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होतो.
डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काही महिला महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करतात. काही वेळेस डार्क सर्कल कमी होतात, पण काही वेळेस स्किन इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण कॉफी पावडरचा (Coffee Powder) वापर करू शकता. आता सणासुदीचे दिवस सुरु आहेत. आपण कॉफी पावडरचा वापर करून डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करू शकता(How to use coffee for dark circles?).
डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपाय
साहित्य
कॉफी पावडर
कांदा-लसणाची सालं फेकू नका, १ सोपा उपाय- अकाली पांढरे झालेले केस होतील काळेभोर
एलोवेरा जेल
मध
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्या, त्यात एक चमचा एलोवेरा जेल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. नंतर कॉटन पॅड अर्धे कापून मिश्रणात भिजवा. यानंतर, डोळ्याखाली ठेवा. १५ मिनिटानंतर कॉटन पॅड काढा आणि डोळ्यांखाली हलके मसाज करा. शेवटी पाण्याने संपूर्ण चेहरा धुवा. उत्तम रिजल्टसाठी आपण हा उपाय आठवड्यातून २ वेळा करू शकता.
डोळ्यांखाली डार्क सर्कल का तयार होतात
- डिहायड्रेशनमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात.
- महिलांमध्ये अॅनिमियाची समस्या खूप सामान्य आहे, ज्यामुळे डार्क सर्कल निर्माण होतात.
- डोळ्यांमध्ये अॅलर्जी असते. तेव्हा शरीर त्या बॅक्टेरियाच्या संसर्गापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी हिस्टामाइन सोडते, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात.
सणावाराच्या दिवसात कपाळावर टॅनिंग दिसतंय? २ चमचे बेसनाचा करा फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो
- व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात.
- स्क्रीन टायमिंग वाढल्यामुळेही डोळे आत जातात, व डार्क सर्कल निर्माण होतात.
- झोपेची कमतरता आणि नैराश्यामुळे डार्क सर्कल दिसतात.